शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकादशी प्रदोष: हरिहर पूजनाने सर्व इच्छांची पूर्ती, अपार यश-प्रगती; नोकरीत बढती, शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 2:25 PM

1 / 15
गणेशोत्सव सुरू आहे. देशभरात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवासह परिवर्तिनी एकादशी आणि प्रदोष या दोन व्रतांचा शुभ योग आहे. शनिवारी, १४ सप्टेंबर २०२४ रोजी परिवर्तिनी एकादशी आहे. तर रविवारी, १५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदोष आहे.
2 / 15
परिवर्तिनी एकादशी आणि प्रदोष व्रत ही हरिहरांना समर्पित असून, हे व्रताचरण केल्याने शुभ पुण्यफलाची प्राप्ती होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच अनेक इच्छांची पूर्ती, यश-प्रगती साध्य करण्याची संधी मिळू शकते, असे म्हटले जाते.
3 / 15
गणेशोत्सव काळात येणाऱ्या या व्रतांना वेगळे महत्त्व प्राप्त होते. गणरायासह हरिहर पूजनाचे पुण्य मिळते. तसेच श्रीविष्णू आणि महादेव शिवशंकरांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते, असे म्हटले जाते. या काळात कोणत्या राशींना कुटुंब, शिक्षण, व्यवसाय, व्यापार आणि आर्थिक आघाडीवर यश प्राप्त होऊ शकते, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आगामी काळात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्राशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यास जास्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. वरिष्ठांचे व कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने मनास थोडे वाईट वाटू शकते. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सहकार्याने व्यवसाय वृद्धीची कामना पूर्ण होईल. तसेच त्या दिशेचे केलेले सर्व प्रयत्न यशस्वी होईल. प्रेमिकेशी संबंध सामान्यच राहतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. कामाच्या बाबतीत इतरांच्या भरवशावर राहू नये, अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. कामाव्यतिरिक्त प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अशा वेळी दिनचर्या व आहार योग्य असावा.
5 / 15
वृषभ: एखाद्या होऊ घातलेल्या कामात अचानकपणे मोठी अडचण आल्याने मन खिन्न होईल. प्राप्तीची साधने बाधित झाल्याने व अनावश्यक वस्तूंवर पैसा खर्च झाल्याने आर्थिक चिंता भेडसावतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित जागी बदली, पदोन्नती किंवा कार्यक्षेत्रातील बदल करण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ प्राप्ती होईल. प्रवास लाभदायी होतील. मुलांशी संबंधीत एखादी चांगली मोठी बातमी मिळू शकते. प्रेम संबंध दृढ राहतील. प्रेमिकेशी सामंजस्य वाढेल. प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. दाम्पत्य जीवनात जोडीदाराकडून सुख व सहकार्य मिळत राहील.
6 / 15
मिथुन: प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. असे असले तरी ह्या संधींचा लाभ घेण्यासाठी वेळेचे व ऊर्जेचे नियोजन करावे लागेल. कामानिमित्त जवळचे किंवा दूरचे प्रवास करावे लागू शकतात. हे प्रवास दमछाक करणारे व लाभदायी होतील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीचे आयोजन होऊ शकते. एखादी कौटुंबिक समस्या चिंतेस कारणीभूत होऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी अतिरिक्त मेहनत करावी लागेल. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
7 / 15
कर्क: नशिबाची साथ मिळेल. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ सहकार्य करत असल्याचे दिसून येईल. परिश्रमाच्या जोरावर सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जमीन, घर किंवा वाहन यांचे सौख्य प्राप्त होऊ शकते. स्पर्धकांना जोरदार टक्कर द्यावी लागू शकते. व्यवसाय वृद्धी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक पुढचे पाऊल उचलावे. तसेच कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नये. एखाद्या महिला मित्राच्या मदतीने समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. प्रेमिकेसह हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवन सुखद होईल.
8 / 15
सिंह: आगामी काळ मानसिक व सामाजिक यश मिळवून देणारा आहे. एखाद्या कार्यामुळे कार्यक्षेत्री किंवा समाजात सन्मानित केले जाऊ शकते. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा किंवा कारकीर्द घडविण्याचा विचार करत असणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ फलदायी आहे. सर्व स्वप्ने साकार होऊन यश प्राप्ती होईल. व्यापारी वर्गासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. आहारावर व दिनचर्येवर विशेष लक्ष द्यावे लागेल. लॉटरी किंवा शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करू नये. निव्वळ कष्ट केल्यानेच लाभ होणार आहे. प्रेमीजनांच्या जीवनात कटुता आली असेल त्यांना एखाद्या महिला मित्राच्या मदतीने ती दूर करता येईल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल.
9 / 15
कन्या: धीराने कामे करावी लागतील. घाई-गडबडीत किंवा दबावाखाली कामे करू नयेत. कामाचा भार जास्त असण्याची संभावना असल्याने हे लक्षात ठेवावे लागेल. कार्यक्षेत्री कामात खोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. व्यापाऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे लागेल. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते , परंतु त्याचे प्रदर्शन करू नये, अन्यथा आपणास त्रासास सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जोडीदाराशी प्रेम व सामंजस्य टिकवून ठेवणे हितावह होईल.
10 / 15
तूळ: वास्तविकतेसह विभिन्न परिस्थितींचा सामना करण्याचा असू शकतो. व्यावसायिकांच्या जीवनात काही समस्या येऊ शकतात. व्यवसायात अपेक्षित लाभ न झाल्याने आपण त्रस्त होऊ शकता. उत्तेजना व आव्हानाने भरलेला असेल. कार्यक्षेत्री लक्ष केंद्रित करण्याचे संकेत मिळू शकतात, ज्यासाठी सतर्क राहावे लागेल. समस्यांना संयमाने व विचारपूर्वक सामोरे जावे, जेणेकरून अपेक्षित समाधान प्राप्त होऊ शकेल. सुरक्षा नियमांचे पालन करावे.
11 / 15
वृश्चिक: कार्यात अधिक परिश्रम करावे लागतील. यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भागीदाराद्वारा निर्माण केल्या जाणाऱ्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नये, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष देण्याची गरज भासेल. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करावा लागेल. संवाद साधून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक उत्कृष्ट वैवाहिक जोडीदारासाठी हे आवश्यक आहे की एकमेकांच्या भावनांचा विचार करून व संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करणे.
12 / 15
धनु: कार्यक्षेत्री महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामगिरीची प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांच्या जुन्या व नवीन योजना यशस्वी होऊन प्रगती होऊ शकेल. काही कामात आव्हाने येऊ शकतात. परंतु बुद्धिमत्ता व संयमाच्या जोरावर ही आव्हाने परतवू शकाल. व्यापार विस्तार करण्याच्या विचारात असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी काळ महत्त्वाचा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराचे सहकार्य प्राप्त होईल.
13 / 15
मकर: आगामी काळ कठीण व आव्हानात्मक असू शकतो. कुटुंब व घराशी संबंधित मुद्द्यांचा सामना करावा लागू शकतो, जो त्रस्त करण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपले वरिष्ठ व सहकारी ह्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. कष्टाळू व समर्पित होण्याचा दृष्टिकोन यशस्वी होण्यास मदत करू शकेल. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करून त्यांचे सहकारी व्हा. तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. नियमित व्यायाम, आहार व आराम यांचे पालन करावे लागेल. जीवनात कठीण परिस्थिती व आव्हाने येतात व जातात हे लक्षात ठेवावे. ह्याकडे एक संधी म्हणून पाहावे, जी विकास व स्वयं परिवर्तनाची संधी देते. संघर्षाच्या माध्यमातून आपण स्थायी समाधान व समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू शकता.
14 / 15
कुंभ: हा कालावधी काहीसा दिलासा देणारा आहे. कामे वेळेवर पूर्ण होतील व त्यामुळे आत्मविश्वास उंचावेल. मित्रांच्या मदतीने स्थगित झालेली कामे पूर्णत्वास जातील. रोजगारात येणारे अडथळे दूर होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक कष्टांच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला आपण जरूर घ्यावा. कोणत्याही प्रकारची जोखीम असणाऱ्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करू नये. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल.
15 / 15
मीन: शुभ व सौभाग्यदायी होण्याचे संकेत आहेत. कारकिर्दीत व व्यापारात यशस्वी होण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सुख-सोयींसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. कार्यक्षेत्री मिळालेल्या जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. असे असले तरी स्वजनांच्या भावनांकडे लक्ष द्यावे लागेल. समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. व्यवसाय वृद्धीसाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून महत्वाचा प्रस्ताव मिळू शकतो. जोडीदारादरम्यान सलोख्याचे संबंध राहतील.
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024ganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मासWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य