Pitru paksha 2021 : वेळेअभावी श्राद्धविधी करणे शक्य नाही? मग या दहा उपायांपैकी एकाचा अवलंब करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 12:48 IST
1 / 10१. पितरांच्या तिथीच्या दिवशी आपल्या जेवणाआधी एक नैवेद्याचे ताट कावळ्याला, गायीला नाहीतर कुत्र्याला ठेवावे. 2 / 10२. पितरांची तिथी माहीत नसेल, तर सर्वपित्री अमावस्येला नैवेद्याचे ताट वाढून काकबली अर्थात कावळ्याला नैवेद्य ठेवावा. 3 / 10३. पितृपक्षात ब्राह्मण भोजनाला महत्त्व असते. परंतु ऐन वेळेस ब्राह्मण उपलब्ध नसले तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. समोरची व्यक्ती जेवून तृप्त झाली पाहिजे, हा त्यामागील हेतू आहे. 4 / 10४. श्राध्दपक्षात दानाला अतिशय महत्त्व आहे. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान, उपयुक्त वस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. 5 / 10५. श्राद्धाचा स्वयंपाक करण्याइतका वेळ नाही? मग शिधा दान करा. शिधा अर्थात कोरडे धान्य त्यालाच कदान्न असे म्हणतात. तसे दिल्यानेही एखाद्याच्या जेवणाची सोय होऊ शकते. 6 / 10६. श्राध्दपक्षात दक्षिणेकडे रोज एक दिवा लावावा, त्यामुळे पितरांचा आत्मा मुक्त होण्यास गती मिळते. 7 / 10७. पितृपक्षात रोज एकदा तरी पितृ स्तोत्र नाहीतर पितृ सूक्ताचे पठण केले पाहिजे. 8 / 10८. मूक प्राण्यांची हिंसा न करता त्यांना जेवू घातले पाहिजे. यात माशांना खाऊ घालणे, कुत्र्याला भाकरी घालणे, गायीला चारा घालणे अशा गोष्टींचा समावेश करता येईल. 9 / 10९. पितरांचे स्मरण करून नैवेद्य दाखवतात सहकुटुंब प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे पितर संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात आणि कुटुंबाची, कुळाची भरभराट होते. 10 / 10१०. दिवसातून एकदा तरी रोज ॐ पितृदेवताभ्यो नम' या मंत्राचा १०८ वेळा जप केला पाहिजे.