शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pitru Paksha 2021: पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे दान करावे? पाहा, प्राचीन परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:31 AM

1 / 12
मराठी वर्षातील सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व पितृपक्ष म्हणजेच पितृपंधरवड्याला आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात पितरांच्या स्मरणार्थ पितृपक्ष असतो. या पितृपक्षात पितरांच्या नावाने श्राद्ध विधी केला जातो. (Pitru Paksha 2021)
2 / 12
यंदाच्या वर्षी मंगळवार, २१ सप्टेंबरपासून पितृपंधरवडा सुरू झाला आहे. चातुर्मासातील भाद्रप महिन्यात येणारा वद्य पक्ष विशेष करून पूर्वजांच्या नामस्मरणासाठी राखून ठेवण्यात आला आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन ज्या तिथीला झाले असेल, पितृपक्षातील त्या तिथीला पूर्वजांचे स्मरण करून श्राद्ध विधी केला जातो.
3 / 12
ज्यांना पूर्वजांच्या निधनाची तिथी माहिती नाही, त्यांनी सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी पिंडदान करावे, असे सांगितले जाते. गरुड पुराण आणि कठोपनिषद या धार्मिक ग्रंथात पितृपक्षाबाबतचे सखोल विवेचन आहे. (pitru paksha donation)
4 / 12
पितृपक्षात काही गोष्टी अजिबात करू नये, असे सांगितले जाते, तसे काही गोष्टी आवर्जुन कराव्यात, असा सल्ला दिला जातो. पितृपक्षातील दानाला वेगळे महत्त्व आहे. आपल्याकडील अनेक धार्मिक ग्रंथात, परंपरांमध्ये दानाचे महत्त्व अधोरेखित केलेले आढळते. भारतीय संस्कृतीत दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पितृपक्षात नेमक्या कोणत्या गोष्टींचे दान करावे? जाणून घ्या...
5 / 12
पितृपक्ष पंधरवड्यात काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भात आपल्याकडे अनेक मान्यता आहे. पितृपक्षातील श्राद्ध विधींमध्ये काळे तीळ अतिशय महत्त्वाचे मानले जातात. या काळ्या तिळांचा दान करणे महत्त्वाचे आणि शुभ मानले गेले आहे. (what to do in pitru paksha)
6 / 12
पितृपक्षात दान केलेले काळे तीळ थेट पूर्वजांना प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात. वारसांना सुख, समृद्धी आणि संपन्नतेचा आशीर्वाद देतात. कुटुंबात धन, धान्याची कमतरता राहत नाही. पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
7 / 12
पितृपक्ष पंधरवड्यात पिंडदानाला अतिशय महत्त्व आहे. तसे अन्य काही गोष्टींचे दानही पितृपक्षात शुभ पुण्यफलदायी मानले गेले आहे. पितृपक्षात भूमिदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. भूमी दान केल्यामुळे अनावधानाने केलेल्या पापांतून मुक्तता होऊ शकते, अशी मान्यता आहे.
8 / 12
भूमिदानाने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. कुटुंबातील नकारात्मकता नष्ट होते. सकारात्मकता वाढते. मान, सन्मान वाढतात. पूर्वजांचे विशेष शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. (what to do in shradh period)
9 / 12
एका मान्यतेनुसार, देवलोक आणि मृत्यूलोक यांमधील पोकळीत पितृलोक असतो. पितृपक्ष पंधरवड्यात चांदी, चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू दान करणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात. वारसांना शुभाशिर्वाद देतात. कुटुंबात शांतता, सकारात्मकता, समाधान नांदते. कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध दृढ होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
10 / 12
आपल्याकडील काही मान्यतांना वैज्ञानिक आधार असा काही नाही. मात्र, परंपरेनुसार त्या एका पिढीपासून ते दुसऱ्या पिढीपर्यंत चालत येतात. काही धार्मिक ग्रंथांमध्येही अशा लोकमान्यतांचा उल्लेख केलेला आढळतो. पितृपक्षासंदर्भात अशा अनेक लोकमान्यता प्रचलित असलेल्या दिसतात. या कालावधीत वस्त्रे दान करावीत, असेही सांगितले जाते.
11 / 12
पितृपक्षात श्राद्ध विधी करताना गुळ आणि मीठ यांचे दान सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ज्या कुटुंबात वारंवार वाद आणि आर्थिक आघाडीवर समस्या निर्माण होत असतात. अशा वारसांनी पूर्वजांच्या नावाने गुळ आणि मीठाचे दान करावे.
12 / 12
यामुळे शुभाशिर्वात मिळतात. पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. याशिवाय चपला-बूट यांचेही दान करणे शुभ मानले गेले आहे. कुटुंबातील आर्थिक समस्यांचे निराकरण शक्य होते, अशी मान्यता आहे. तसेच छत्री, गमछा यांचे दानही सकारात्मक मानले गेले आहे. कुटुंबात सुख, शांतता, समाधान, समृद्धी नांदते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष