शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पितृपक्षात ‘या’ ६ राशींना अचानक धनलाभ योग; लक्ष्मी देवीसह पूर्वजांचे शुभाशिर्वाद, भाग्योदय काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 4:11 PM

1 / 9
सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. आपल्याकडे पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्याकडून शुभाशिर्वाद घेण्याची प्राचीन परंपरा आहे. १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत पितृपक्ष असून, २५ सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्या आहे. (pitru paksha 2022)
2 / 9
भाद्रपदातील वद्य पक्ष पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी विशेषत्वाने राखून ठेवण्यात आला आहे. देवतांप्रमाणे पूर्वजांमध्येही शाप आणि वरदान देण्याची शक्ती असते, अशी मान्यता आहे. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी पितृपक्षात त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करून अन्न आणि पाणी देण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अगदी रामायण आणि महाभारतातही याचे उल्लेख आढळतात.
3 / 9
वारसांनी अर्पण केलेल्या गोष्टी ग्रहण करून पूर्वज तृप्त होतात आणि प्रसन्न चित्ताने शुभाशिर्वाद देतात, अशीही मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा काही राशीच्या मंडळींना पितृपक्षाचा काळ उत्तम ठरणार असून, पूर्वजांसह लक्ष्मी देवीचीही कृपा लाभू शकते, जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ त्यांच्यासाठी अनुकूल आहे. पितृ पक्षात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. यावेळी गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना या कालावधीत लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे अनेक नवीन स्त्रोत आर्थिक स्थिती सुधारू शकतात. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात प्रवासाचे योग आहेत. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ शुभ आहे. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. अविवाहित तरुणांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात.
7 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा शुभ काळ ठरू शकणार आहे. विवाहयोग्य तरुण-तरुणींसाठी हा काळ उत्तम आहे. या काळात विवाहासाठी चांगली स्थळे येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच आरोग्य चांगले राहील.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींसाठी सदर काळ यशकारक ठरू शकेल. लोकांच्या प्रगतीसाठी आणि भविष्यात नवीन पदांच्या प्राप्तीसाठी अनुकूल आहे. जर तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे. तब्येतीची काळजी घ्या.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ लाभदायक ठरू शकतो. या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषpitru pakshaपितृपक्षZodiac Signराशी भविष्य