शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pitru Paksha 2023: आज गजलक्ष्मीच्या पूजेनिमित्त तुळशीच्या बाजूला लावा 'ही' रोपं; वर्षभर होईल भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 11:56 AM

1 / 5
तिन्ही सांजेला आपण तुळशीची पूजा करतो, कारण तिचे आशीर्वाद वास्तूसाठी लाभदायक मानले जातात. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी आणि विष्णू यांचे स्थान असते अशी सद्भावना असते. तसेच त्याची नित्य पूजा करून त्याला पाणी दिल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात तुळशीचे नियम स्पष्ट केले आहेत. त्यामुळे घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते. यासोबतच घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही. हिंदू धर्मानुसार तुळशीच्या रोपाबरोबर काही खास झाडे लावल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि वास्तूची भरभराट होते.
2 / 5
म्हणूनच आज गजलक्ष्मीच्या व्रताच्या निमित्ताने आपण तुळशी आणि इतर कोणत्या आवश्यक रोपांची रागवड करता येईल ते जाणून घेऊया. जेणेकरून गजलक्ष्मीचा वास कायमस्वरूपी घरात राहील.
3 / 5
शमी : वास्तु आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये शमीची वनस्पती खूप शुभ मानली जाते. शमीची वनस्पती शनिदेवाशी संबंधित मानली जाते आणि त्याची पानेही भगवान शंकराला अर्पण केली जातात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशीच्या रोपासोबत ही वनस्पती घरात लावल्यास कुटुंबाला अनेक पटींनी लाभ होतो. त्यामुळे घरात जेथे तुळशीचे रोप लावले जाते, तेथे शमीचे रोपही लावावे.
4 / 5
काळा धोतरा : देवांचा देव महादेवाला काळा धतुरा अतिशय प्रिय आहे. काळ्या धतुर्‍याच्या रोपामध्ये भगवान शिव वास करतात असे मानले जाते. यामुळे घरामध्ये हे रोप लावल्याने भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच ते घरामध्ये लावून त्याची नित्य पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तुमच्या आजूबाजूला धतुर्‍याचे रोप असेल तर रोज सकाळी आंघोळ करून त्या रोपाला दूध पाण्यात मिसळून अर्पण करा. यामुळे तुम्हाला व्यवसायात प्रगती होईल.
5 / 5
केळी : वास्तु आणि ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये केळीचे रोप लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. असे मानले जाते की तुळशीच्या रोपाजवळ केळीचे झाड लावल्याने खूप फायदे मिळतात. पण लक्षात ठेवा की दोन्ही झाडे एकत्र न लावता केळीचे रोप मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला आणि तुळशीचे रोप उजव्या बाजूला ठेवावे.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्षVastu shastraवास्तुशास्त्र