शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pitru Paksha 2023: काय सांगता? तुम्हाला पितरांची तिथी निश्चित माहीत नाही? मग करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 2:29 PM

1 / 5
>> शास्त्र सांगते की, निधन महिना माहीत आहे पण तिथी माहीत नसेल तर त्या महिन्यात दर्शअमावस्या किंवा शुक्ल वा कृष्ण एकादशीच्या दिवशी श्राद्ध करावे.
2 / 5
>> निधनतिथी माहीत असेल, पण महिना लक्षात नाही, अशा वेळी मार्गशीर्ष, माघ, भाद्रपद, आषाढ यापैकी एखाद्या महिन्यातील तिथीला श्राद्ध करावे.
3 / 5
>> बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मागमूस लागून ती व्यक्ती बारा वर्षे परत आली नाही व तिच्या वयोमानाचा अंदाज घेऊन तिच्या मरणाविषयी खात्री झाली तर पालाशविधीने और्ध्वदेहिक करून तो दिवश वार्षिक श्राद्धासाठी घ्यावा. योगायोगाने ती व्यक्ती परत आली, तर त्यासाठी शास्त्रात स्वतंत्र विधी दिलेला आहे.
4 / 5
>> याउपर सर्वपित्री अमावस्या या तिथीला पितरांची निधन तिथी माहीत असो वा नसो, त्यांच्या नावे श्राद्ध घालून पितृऋण व्यक्त करू शकतो.
5 / 5
एकूणच काय, तर कोणत्याही गोष्टीसाठी अडून न राहता त्यातून मार्ग काढत पुढे जा, अशी छान शिकवण आपल्याला धर्मशास्त्रातून मिळते. असा धर्म आपण पाळावा आणि धर्माचे रक्षण करत तो वृद्धींगत करावा.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष