शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 1:14 PM

1 / 12
चातुर्मासातील पितृपक्षाचा काळ सुरू आहे. पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने झाली, तर आता पितृपक्षाची समाप्ती सूर्यग्रहणाने होणार आहे. चंद्रग्रहण मीन राशीत झाले, तर सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे. मीन राशीत राहु आणि कन्या राशीत केतु आहे. त्यामुळे यंदाचा पितृपक्ष कालसर्प योगात आहे. कालसर्प दोष आणि पितृदोष हे अतिशय प्रभावी मानले जातात. याच कारणाने यंदाचा पितृपक्ष विशेष आणि महत्त्वाचा मानला जात आहे.
2 / 12
ज्योतिषशास्त्रात चंद्र ग्रह शीघ्र गतीने गोचर करणारा ग्रह आहे. पितृपक्षाच्या कालावधीत चंद्राचे भ्रमण मीन ते कन्या राशी असे होणार आहे. त्यामुळे या कालावधीत वृषभ राशीत चंद्र आणि गुरुची युती होऊन गजकेसरी योग जुळून येणार आहे. तसेच मिथुन राशीत मंगळ आणि चंद्राच्या युतीने महालक्ष्मी योग जुळून येणार आहे. सिंह राशीत बुध ग्रहाशी युती योग जुळून येत आहे.
3 / 12
सर्वपित्री अमावास्येला पितृपक्षाची समाप्ती ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्राशी युती कन्या राशीत होणार आहे. तसेच कन्या राशीत केतु ग्रहासोबत सूर्य, चंद्राचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. तसेच या तीनही ग्रहांचा मीन राशीत असलेल्या राहु ग्रहाशी समसप्तक योग जुळून येत आहे. चंद्राचे भ्रमण आणि कालसर्प योगात असलेला पितृपक्ष काही राशींना अतिशय लाभदायक, पितरांची कृपा, लक्ष्मी देवीचा शुभाशिर्वाद लाभू शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 12
मेष: प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीतही वाढ होऊ शकते. भौतिक सुख मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. मेहनतीचे फळ मिळेल. पदोन्नती मिळू शकते तसेच पगारातही वाढ होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो.
5 / 12
मिथुन: स्थावर मालमत्तेच्या बाबतीत नफा मिळण्याची चिन्हे आहेत. पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनातील तणावातून दिलासा मिळू शकेल. पितृ पक्षात केलेले कार्य यशस्वी होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. कोणत्याही संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून कर्ज घ्यायचे असेल तर इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. करिअरमध्ये शुभ परिणाम मिळतील. कुटुंबात सर्व सदस्यांची प्रगती होऊ शकेल.
6 / 12
कर्क: पितृपक्षात आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पितरांच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ शकेल. पितृदोषापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढीसाठी घेतलेले निर्णय यशस्वी होतील. चांगला आर्थिक लाभ मिळेल. नोकरीत बदलाची योजना आखत असतील तर इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत पूर्वजांच्या नावाने परोपकारी कार्य कराल. पूर्वज प्रसन्न होऊ शकतात.
7 / 12
कन्या: पितृपक्षात तणाव कमी होताना दिसत आहे. जीवनशैलीत सुधारणा दिसून येईल. मानधनात चांगली वाढ होईल. पूर्वजांच्या आशीर्वादाने उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. पूर्वजांसोबत आई-वडिलांचा आशीर्वादही मिळेल.
8 / 12
तूळ: अनेक पटींनी जास्त फळ मिळू शकते. आर्थिक लाभासोबत प्रत्येक क्षेत्रात भरीव यश मिळू शकते. अनेक समस्या संपुष्टात येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करू शकता. याचा फायदा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
9 / 12
धनु: लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद असेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. अध्यात्माकडे अधिक कल असेल. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात विशेष लाभ मिळू शकतो. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना यश मिळू शकते. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. कामाचा विचार करून काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. अनेक कामांमध्ये यश मिळवू शकाल.
10 / 12
मकर: आगामी काळ फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विविध क्षेत्रात यश मिळू शकते. चांगले पैसे कमवू शकता. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपू शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात चांगला समन्वय निर्माण होईल.
11 / 12
कुंभ: लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. कुटुंबाच्या पाठिंब्यासोबत सौभाग्य वाढू शकेल. अध्यात्माकडे अधिक कल असेल. करिअरच्या क्षेत्रात उच्च पदासह पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून बरेच फायदे मिळू शकतात. आयात-निर्यात व्यवसायातही नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मास