शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 1:57 PM

1 / 12
चातुर्मासातील पितृपक्ष सुरू आहे. यंदाचा पितृपक्ष कालसर्प योगात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पितृपक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण झाल्यानंतर आता सर्वपित्री अमावास्या म्हणजेच पितृपक्षाच्या सांगतेला सूर्यग्रहण असेल. तसेच चंद्रासह अन्य ग्रहांच्या गोचरामुळे विविध प्रकारचे योग जुळून येत आहे.
2 / 12
या कालावधीत वृषभ राशीत चंद्र आणि गुरुची युती होऊन गजकेसरी योग जुळून येणार आहे. मिथुन राशीत मंगळ आणि चंद्राच्या युतीने महालक्ष्मी योग जुळून येणार आहे. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राशी युती कन्या राशीत होणार आहे. कन्या राशीत केतु ग्रहासोबत सूर्य, चंद्राचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. या तीनही ग्रहांचा मीन राशीत असलेल्या राहु ग्रहाशी समसप्तक योग जुळून येत आहे.
3 / 12
यासह बुध कन्या राशीत गोचर करणार आहे. यावेळी सूर्यासोबत बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. बुध कन्या राशीत आल्यामुळे भद्र राजयोग तयार होत आहे. या एकंदर ग्रहस्थितीमुळे काही राशींना अचानक धनलाभ, करिअर, व्यवसायात फायदा, नफा होऊ शकतो. नोकरीत पद-पैसा वाढू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...
4 / 12
मेष: हा काळ फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात. प्रयत्नांमुळे उच्च प्रगती होऊ शकते. व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. सहलीला जाण्याचे नियोजन करू शकता.
5 / 12
वृषभ: आगामी काळ भाग्याचा ठरू शकतो. नशिबाची साथ मिळेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित यश मिळू शकते. देवावरील विश्वास अधिक दृढ होईल. घरात धार्मिक शुभ कार्यक्रम होतील. मन धार्मिक कार्यात सर्वाधिक केंद्रित असेल. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. बँक बॅलन्स वाढेल. परदेशात करिअर करण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
6 / 12
मिथुन: शुभ प्रभावामुळे धन वाढ होऊ शकेल. व्यवसाय करणाऱ्यांना लाभाच्या अनेक संधी मिळतील. कमाईची उत्तम संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळेल. कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
7 / 12
तूळ: शुभ प्रभावामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळेल. आर्थिक प्रगती होईल. नातेसंबंध सुधारतील. कुटुंबात भावंडांचे प्रेम वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंब आनंदी राहील. पैसे कमावण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील. व्यावसायिक लोकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
8 / 12
वृश्चिक: मेहनतीचे फळ मिळेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली संधी मिळाल्यास मन प्रसन्न राहील. एखादी योजना किंवा संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळेल. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण होईल. व्यवसायाच्या संदर्भात कोणतेही पाऊल उचलाल ते फायदेशीर ठरेल. काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने जीवनाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या सोडवण्यात मदत मिळेल. एखादा वाद चर्चेतून सोडवला जाईल.
9 / 12
धनु: अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. जीवनात अनपेक्षित प्रगती दिसून येऊ शकते. जुने मित्र भेटतील. आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगतीबरोबरच व्यवसायात प्रगती होऊ शकेल.
10 / 12
मकर: शुभ प्रभावामुळे नोकरीची चांगली संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नवीन वाहन खरेदी करू शकता. कौटुंबिक जीवनात संबंध मधुर होतील. धार्मिक कार्यात रुची राहील. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. नोकरदारांना त्यांच्या कामात यश मिळेल. सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल.
11 / 12
कुंभ: शुभ आणि फलदायी सिद्ध ठरू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक लाभ होईल. नोकरदारांचे पगार वाढू शकतात. व्यवसायात लाभ होईल.
12 / 12
मीन: आगामी काळ शुभ ठरू शकेल. नशिबाने साथ दिली तर नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरदारांना अपेक्षित पदोन्नती मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळतील. परंतु, हितचिंतकांचा सल्ला घ्यावा. चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च कराल. इच्छित किंवा बहुप्रतिक्षित वस्तू घरात आल्यावर आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. व्यवसायात लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मास