शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुभच होणार! ‘या’ ९ राशींवर लक्ष्मी कृपा; दसरा-दिवाळी दणक्यात, अपार यश, पैसा अन् लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 12:06 PM

1 / 15
ऑक्टोबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात चातुर्मासातील अत्याधिक महत्त्व असलेल्या दसरा, दिवाळीसह अन्य सण-उत्सव, व्रत-वैकल्ये असणार आहेत. तसेच ज्योतिषीय दृष्टिनेही ऑक्टोबर महिना उत्तम असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 15
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ०२ ऑक्टोबर रोजी कन्या राशीत मार्गी झालाय. तसेच २६ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ १६ ऑक्टोबर रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल.
3 / 15
नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी २६ ऑक्टोबर रोजी आपलेच स्वामीत्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणार आहे. अशा एकूण सण-उत्सव आणि ग्रहांच्या राशीपरिवर्तनाच्या कालावधीत कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी महिना कसा जाईल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळतील? कुणासाठी ऑक्टोबर काहीसा संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना पुढील दिवस सकारात्मक ठरू शकतील. यासोबतच तुमचे व्यक्तिमत्त्वही अधिक सुधारेल. घरात कोणत्याही शुभ कार्याची योजना तयार होईल. व्यवसायात गतिमानता येईल. तुमची कोणतीही व्यवसाय योजना इतरांसोबत शेअर करू नका, असा सल्ला दिला जात आहे. व्यस्त दिनचर्येतून कुटुंबासोबत काही वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आगामी दिवस अनुकूल ठरू शकतात. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारणे हे तुमचे विशेष प्रयत्न आणि ध्येय असू शकते. दीर्घकालीन फायद्यांसाठी तुम्ही पॉलिसी इत्यादीमध्येही गुंतवणूक करू शकता. तुमच्या अपेक्षेनुसार व्यवसायात योग्य बदल होईल. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या योग्य सहकार्यामुळे उत्पादनात आणखी वाढ होईल. या महिन्यात तुम्ही कुटुंब आणि मुलांशी संबंधित जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ यशकारक ठरू शकेल. एखाद्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल. स्थावर मालमत्तेबाबत घेतलेले निर्णय योग्य ठरतील. ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या मदतीने कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय आणि सामंजस्य राहील. योग आणि ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकेल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ काहीसा धकाधकीचा जाऊ शकेल. तुम्ही तुमच्या कामात अधिक व्यस्त राहाल. आर्थिक बाबतीत ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायातील भागीदार आणि कर्मचारी यांच्याशी योग्य समन्वय साधूनच त्याची कामे पार पाडा. आयात-निर्यात व्यवसायात नवीन करार आणि ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत असेल तर अजिबात गाफील राहू नका.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. घाई न करता शांततेत कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न इतरांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. कोणतेही व्यावसायिक काम रखडले असेल तर ते थोडे प्रयत्न करूनच पूर्ण होऊ शकते. व्यवसायात पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. तणावामुळे जीवनसाथीसोबत काही वाद होऊ शकतात. हलका व पचायला उत्तम असाचा आहार घेणे उपयुक्त ठरू शकेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ चांगला ठरू शकेल. कुटुंबाशी संबंधित समस्येचे निराकरण होईल. करिअरच्या दृष्टिने अनुकूल कालावधी ठरू शकतो. येणी या महिन्यात दिलेले परत मिळू शकतात. भविष्यातील योजना बाजूला ठेवून वर्तमानातील कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दल आदर राहील. आरोग्य चांगले राहू शकेल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ ठीकठाक ठरू शकेल. हा महिना आत्म्याचे विश्लेषण आणि आत्मनिरीक्षणासाठी आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा दिलासा मिळेल. तरुणांना नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळू शकेल. उद्योग-व्यवसायात अतिशय गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतील. वैवाहिक जीवनही आनंददायी राहील.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ उत्तम ठरू शकेल. न्यायालयाशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर त्यात सकारात्मक बातमी मिळू शकेल. नवीन विषयांची माहिती होईल. कोणतेही अडकलेले किंवा कर्ज दिलेले पैसे सहजपणे परत केले जाऊ शकतात. नवीन ऑफर मिळू शकतील. तुमचे व्यावसायिक निर्णयही योग्य असल्याचे सिद्ध होईल. प्राणायाम आणि योगासने करणे उपयुक्त ठरू शकेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ विशेष ठरू शकेल. सामाजिक कार्यात तुमच्या योगदानाचे खूप कौतुक होईल. राजकीय विषय काळजीपूर्वक हाताळावे लागतील. शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. विश्रांती घेण्यासोबतच उष्णतेपासून स्वतःचा बचाव करा.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ महत्त्वाचा ठरू शकेल. या महिन्यात तुम्ही मोठे निर्णय घ्याल आणि नवीन जबाबदारी पार पाडण्यातही यशस्वी व्हाल. नातेवाइकांमध्ये कोणाच्या तरी विवाहासंबंधी शुभवार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसाय विस्ताराशी संबंधित कोणतीही योजना राबवली जाईल. आपला दिनक्रम व्यवस्थित ठेवा.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. नवीन संपर्क तयार होतील. या काळात तुम्हाला बरीच चांगली माहिती मिळेल. राजकीय कार्याकडे तुमचा कल वाढेल. तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. कर्मचार्‍यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. स्वतःची काळजी घ्या.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ चांगला ठरू शकेल. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि आनंदी असाल. महिलांसाठी हा महिना अतिशय अनुकूल आहे. काही महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर तुमच्या सल्ल्याला मोठा हातभार लागेल. व्यवसायात तुमच्या कामाचा अधिक विचार करण्याची गरज आहे. सरकारी नोकरांना बढतीची संधी मिळू शकते. आरोग्याबाबत जागरूक राहा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य