शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Planetary Transit April 2022: महासंयोग: सर्व ९ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन, छप्परफाड लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 7:58 AM

1 / 12
एप्रिल महिना हा विविध घटनांचा पण महत्त्वाचा मानला गेला आहे. एप्रिल महिन्यात मराठी नववर्ष सुरू होत आहे. इतकेच नव्हे तर ज्योतिषीय दृष्ट्याही एप्रिल महिना अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. याचे कारण म्हणजे सर्वच्या सर्व नवग्रह या एकाच महिन्यात आपापली स्थाने बदलणार आहे. (planetary position april 2022)
2 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार ही ऐतिहासिक घटना मानली जात असून, याचा सर्व राशींवर देश, जगावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रथमच सर्व नऊ ग्रह एकाच महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. (9 planets changing house april 2022)
3 / 12
नवग्रहाचा सेनापती मंगळ ०७ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ८ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. यानंतर २४ एप्रिल रोजी बुध वृषभ राशीत प्रवेश करेल. नवग्रहातील महत्त्वाचा मानला गेलेला गुरु ग्रह आपलेच स्वामीत्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल. (navgrah rashi gochar april 2022)
4 / 12
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १४ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करे. यानंतर प्रेम आणि आकर्षणाचा कारक शुक्र ग्रह १७ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर सर्वांत महत्त्वाचे राशीपरिवर्तन हे नवग्रहातील न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनी ग्रहाचे कुंभ राशीत २९ एप्रिल रोजी होणार आहे. (planetary transit april 2022)
5 / 12
काही पंचांगानुसार, नवग्रहातील छाया ग्रह मानले जाणारे राहु आणि केतु मध्यम गतीने १२ एप्रिल रोजी राशीबदल करून अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत प्रवेश करतील. काही पंचांगानुसार, राहु आणि केतु या दोन ग्रहांनी मार्च महिन्यातच राशीपरिवर्तन केले आहे. चंद्र ग्रह दर दोन ते अडीच दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो.
6 / 12
नवग्रहातील या ग्रहांचा एकाचवेळी होणारे राशीपरिवर्तन अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. या ग्रहांच्या परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, ५ राशींवर याचा शुभ प्रभाव पाहायला मिळणार असून, अनेकविध लाभ आगामी कालावधीत होऊ शकतील, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या...
7 / 12
एप्रिलमध्ये होणाऱ्या नवग्रहांचे राशीपरिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ प्रभाव देणारे ठरू शकेल. मिळकतीच्या स्रोतांमध्ये वृद्धि होऊ शकेल. करिअरमध्ये यश, प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतील. कार्यक्षेत्रात होणारे बदल तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतील. मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढू शकेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. हाती घेतलेली कामे पूर्ण होऊ शकतील. योजना मार्गी लागू शकतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
8 / 12
एप्रिलमध्ये होणाऱ्या नवग्रहांचे राशीपरिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्यकारक ठरू शकेल. मेहनतीचे चीज होऊ शकेल. लाभदायक घटना घडू शकतील. कार्यालयातील सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. उद्योग, व्यापार, व्यवसायात प्रगती होऊ शकेल. मिळकत वाढू शकेल. पद-प्रतिष्ठा मिळू शकेल. या कालावधीचा उत्तरार्ध शुभ लाभ मिळू शकतील. मात्र, आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
9 / 12
एप्रिलमध्ये होणाऱ्या नवग्रहांचे राशीपरिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. कार्यालयात सकारात्मक वातावरण लाभू शकेल. कामात अधिक लक्ष लागेल. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतील. वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतील. भौतिक सुख प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. भाग्याची भरपूर साथ लाभू शकेल. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना आगामी कालावधी चांगला ठरू शकेल.
10 / 12
एप्रिलमध्ये होणाऱ्या नवग्रहांचे राशीपरिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुभ फलदायी ठरू शकेल. कार्यक्षेत्रात यश, प्रगतीच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकेल. याचा भविष्यात फायदा मिळू शकेल. जुनी येणी या कालावधीत प्राप्त होऊ शकतील. व्यापार, व्यवसाय, उद्योग विस्ताराच्या योजनेवरील कामे पुढे सरकतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील.
11 / 12
एप्रिलमध्ये होणाऱ्या नवग्रहांचे राशीपरिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. या कालावधीचा उत्तरार्ध अधिक चांगला ठरू शकेल. उच्चाधिकारी आणि प्रतिष्ठित लोकांचे उत्तम सहकार्य लाभू शकेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकतील. कार्यक्षेत्र बदलण्याची इच्छा असेल, तर चांगला कालावधी ठरू शकेल. कार्यक्षेत्रात विस्तारू शकेल. अतिरिक्त जबाबदारी मिळू शकेल. नोकरीत पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतील.
12 / 12
यापूर्वी काही महिन्यांपूर्वी एकाचवेळी ५ ते ६ ग्रहांनी राशीपरिवर्तन केले आहे. मात्र, एकाच महिन्यात महत्त्वाच्या ग्रहांसह सर्व नवग्रह राशीपरिवर्तन होण्याचा हा अद्भूत तसेच दुर्मिळ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य