शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ राशींच्या लोकांसाठी ऑगस्ट ‘लाभदायक’, ४ ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा दिसणार प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 7:50 AM

1 / 12
मराठी वर्षातील महत्त्वाचा कालावधी म्हणजे चातुर्मास. आताच्या घडीला चातुर्मास सुरू आहे. तर, सण-उत्सव आणि व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेलेला श्रावण सुरू झाला आहे. श्रावणात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. (planets transits in august 2022)
2 / 12
श्रावणात नागपंचमीपासून ते पोळापर्यंत अनेकविध प्रकारचे सण-उत्सव साजरे केले जातात. श्रावण सुरू झाल्यानंतर लगेचच इंग्रजी महिना ऑगस्टलाही सुरुवात होत आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार, ऑगस्ट ८ वा महिना येतो. (planets position in august 2022)
3 / 12
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, स्वातंत्र्यदिनासह गणेशोत्सवासारखे अतिशय महत्त्वाचे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याप्रमाणे ऑगस्ट महिनाही महत्त्वाचा मानला गेला आहे. (planet transit position in august 2022 astrology)
4 / 12
या संपूर्ण महिन्यात गुरु आणि शनी आपापल्या राशींमध्ये वक्री आहेत. महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केलेला असेल. यासोबतच ऑगस्टमध्ये सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुधसह अनेक ग्रह राशीपरिवर्तन करतील. (graha rashi parivartan gochar in august 2022)
5 / 12
संपूर्ण महिन्यातील ग्रहांच्या या बदलाचा शुभ प्रभाव विशेषत: एकूण ५ राशींवर दिसून येईल, ज्यांना कमाई आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. ऑगस्टमध्ये ग्रहांच्या बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होत आहे हे जाणून घेण्यापूर्वी, ऑगस्टमध्ये कोणते ग्रह कधी राशीबदल करतात, हे जाणून घेऊया...
6 / 12
ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी बुधने सिंह राशीत प्रवेश केलेला असेल. यानंतर ७ ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर, १० ऑगस्ट मंगळ आपले स्वामित्व असलेल्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल.
7 / 12
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑगस्ट रोजी आपलेच स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर, २१ ऑगस्ट रोजी बुध राशीपरिवर्तन करुन कन्या राशीत प्रवेश करेल आणि महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्टला शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत विराजमान होईल. या एकूण ग्रहस्थितीचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल, ते जाणून घेऊया...
8 / 12
वृषभ राशीच्या व्यक्तींना ऑगस्टमधील ग्रहमान अनेकविध बाबतीत लाभदायक ठरू शकेल. या काळात घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. बौद्धिक क्षमता वाढू शकेल. तुमच्या ज्ञानात भर होईल, ज्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल. मात्र, तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही जितके शांत राहाल तितकी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल.
9 / 12
मिथुन राशीच्या व्यक्तींना ऑगस्टमधील ग्रहमान फायदेशीर ठरू शकेल. तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. काही लोक व्यवसायाचा विस्तार करण्यात यशस्वी होऊ शकतात. तुमच्या संपर्कांद्वारे नफा मिळवू शकता. सामाजिक स्तरावर दर्जा वाढेल. ज्ञानाने तुम्ही लोकांच्या नजरेत तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकता. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्ही स्पर्धा परीक्षांना बसणार असाल तर, शेवटचे दहा दिवस यशस्वी ठरू शकतात.
10 / 12
सिंह राशीच्या व्यक्तींना ऑगस्टमधील ग्रहमान अनुकूल ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. जे तुमच्या कामावर प्रश्न उपस्थित करत होते, ते तुमची प्रशंसा करू शकतात. उत्पन्न वाढू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवनातही सुख-समृद्धी राहील. मनोरंजन आणि घरगुती गरजांवर पैसे खर्च करू शकतात. तुमच्या तब्येतीतही चांगले बदल होऊ शकतात.
11 / 12
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ऑगस्टमधील ग्रहमान यशकारक ठरू शकेल. व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचे बिघडलेले काम होऊ शकते. सामाजिक स्तरावर तुमचे संपर्क वाढतील, ज्याचा तुम्हाला आगामी काळात फायदा होऊ शकतो. तुमचे करिअर नवीन उंची गाठू शकेल. वैवाहिक जीवनात मात्र सावध राहून पुढे जावे लागेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे.
12 / 12
मीन राशीच्या व्यक्तींना ऑगस्टमधील ग्रहमान प्रगतीकारक ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ नक्कीच मिळेल. नोकरीच्या ठिकाणी जिद्द आणि मेहनतीने काम करणाऱ्यांना बढती मिळू शकते. काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. तुमच्या प्रभावक्षेत्रातही वाढ होईल. तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल आणि तुम्हाला योग्य आदर देईल. तुमचे धैर्य, सामर्थ्य वाढू शकते. प्रसिद्धी मिळू शकते. आरोग्याबाबतची चिंता दूर होऊ शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य