शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहु गोचर: ४ राशींना सुवर्णकाळ, गुरु-चांडाल योगातून मुक्तता; यश-प्रगती, धन-धान्य वृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 3:03 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यात सर्वांत महत्त्वाचे गोचर होणार आहे, ते म्हणजे राहु-केतुचे. राहु आणि केतु विद्यमान घडीला अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत आहेत. ३० ऑक्टोबर रोजी वक्री चलनाने राहु आणि केतु राशीपरिवर्तन करत अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील. सुमारे १८ महिने हे दोन्ही ग्रह एखाद्या राशीत विराजमान असतात.
2 / 9
राहु आणि केतु एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. विशेष म्हणजे आताच्या घडीला मेष राशीत राहु आणि गुरु यांच्या युतीने गुरु-चांडाल योग सुरू आहे. हा योग प्रतिकूल मानला जातो. मात्र, राहुच्या मीन प्रवेशाने या योगाची समाप्ती होणार आहे.
3 / 9
गुरु-चांडाल योगाच्या समाप्तीमुळे चार राशींना दिलासा मिळणार असून, सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. नोकरी, कुटुंब, व्यवसाय, आर्थिक आघाडी, बिझनेस अशा अनेकविध आघाड्यांवर काही उत्तम लाभ मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. ४ लकी राशी कोणत्या, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना गुरु-चांडाल योग मुक्तीचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. गेल्या ७ महिन्यापासून मेष राशीत गुरु-चांडाल योग सुरू आहे. गुरु-चांडाल योग समाप्तीनंतर चांगले दिवस सुरू होऊ शकतात. इच्छित नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. व्यावसायिकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. एकंदरीत आगामी काळ अनुकूल आहे.
5 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना गुरु-चांडाल योग समाप्तीचा लाभदायक ठरू शकेल. उत्पन्न वाढेल. व्यावसायात नवीन संधी मिळतील. व्यावसायिक संबंध सुधारतील. धार्मिक आणि शुभ कार्यात रस राहील. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्यांसाठी हा काळ खूप फलदायी ठरू शकतो.
6 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना गुरु-चांडाल योग समाप्तीचा शुभ लाभ मिळू शकेल. तूळ राशीत केतु विराजमान असून, या राशीवर राहु आणि गुरूची थेट दृष्टी आहे. राहु मीन राशीत जाईल, तेव्हा चांगले दिवस येतील. पैसा आणि करिअरच्या बाबतीत शुभ संधी निर्माण होतील. अपेक्षित परिणाम मिळतील. समाजात तुमची ओळख निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये महत्त्व वाढेल. नातेवाईक आणि मित्रांशी संबंध सुधारतील.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना गुरु-चांडाल योग समाप्ती शुभ फलदायी ठरू शकेल. भाग्याची साथ मिळेल. सर्व बाजूंनी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कोणत्याही नवीन योजनेत यश मिळेल. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल. सोने-चांदीच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यापार्‍यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणार्‍यांना प्रमोशन मिळू शकते. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये अपेक्षित संधी मिळतील.
8 / 9
ऑक्टोबर महिन्यात पितृपक्ष सुरु असून, १५ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांचा कन्या राशीत शुभ मानला गेलेला बुधादित्य योग जुळून येणार आहे. हा योग राजयोगांपैकी एक मानला गेला आहे. याचा शुभ प्रभाव पडलेला पाहायला मिळू शकतो.
9 / 9
कन्या राशीतून हे दोन्ही ग्रह एक दिवसाच्या अंतराने तूळ राशीत प्रवेश करणार असून, तूळ राशीतही बुधादित्य योग कायम राहणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य