rahu gochar in bharani nakshatra june 2022 these remedies useful to reduce negative effect of rahu
राहुचा भरणी नक्षत्र प्रवेश: ‘या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा; नुकसान टाळा, शुभलाभ मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 2:16 PM1 / 15जूनमध्ये नवग्रहांचे अतिशय महत्त्वाचे असे स्थानबदल, राशीपरिवर्तन होताना पाहायला मिळत आहे. नवग्रहांमध्ये छाया ग्रह मानल्या गेलेल्या राहु-केतुचाही समावेश आहे. हे दोन्ही छाया ग्रह असले, तरी या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाला तितकेच महत्त्व आहे. राहु-केतुच्या प्रभावामुळे राजाचा रंक अन् रंकाचा राजा होऊ शकतो, अशी मान्यता आहे. (rahu transit bharani nakshatra june 2022)2 / 15सध्या राहु मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत विराजमान आहे, तर केतु शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीत आहे. विशेष म्हणजे राहु आणि केतु कायम वक्री चलनाने राशीबदल करत असतात. सन २०२२ च्या एप्रिल महिन्यात या दोन्ही ग्रहांनी सदर राशीत प्रवेश केला असून, सुमारे दीड महिना ते याच राशीत असतील. तसेच सुख-समृद्धीकारक शुक्र ग्रह मेष राशीतच विराजमान आहे. शुक्र आणि राहु मित्र ग्रह मानले गेले आहे. (rahu in bharani nakshatra 2022)3 / 15शुक्र आणि राहुची युती विशेष फलदायी ठरू शकेल, असे म्हटले जाते. तसेच १४ जून रोजी राहुने कृतिका नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश केला. या नक्षत्रात पुढील सुमारे २४६ दिवस राहु विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. भरणी नक्षत्राचे स्वामित्व शुक्राकडे असून, याची देवता यम आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग मानला जात आहे. (rahu gochar in bharani nakshatra 2022)4 / 15राहुच्या भरणी नक्षत्रातील प्रवेशाचा देश-दुनियेसह राशींवरही प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे. काही राशीच्या व्यक्तींना हा कालावधी शुभलाभदायक ठरू शकेल, तर काही राशीच्या व्यक्तींना तो संमिश्र अथवा आव्हानात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. मात्र, आगामी कालावधीत काही गोष्टींचे भान आपण राखले पाहिजे, असा सल्ला दिला जातो. 5 / 15एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु-केतुची दशा किंवा महादशा सुरू असेल, तर असे ग्रहमान सदर व्यक्तीला कष्टकारक, समस्याकारक ठरू शकते. ज्योतिषशास्त्रातील काही ग्रंथांत राहु-केतुची महादशा अथवा राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव असल्यास काही उत्तम उपाय उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहेत. मात्र, त्याबरोबर काही गोष्टी लक्षात ठेऊन कार्यरत राहिल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते, असे सांगितले जात आहे. 6 / 15राहुच्या प्रभावामुळे सारासार विचार आणि सद्सद्विवेक बुद्धीची क्षमता क्षीण व्हायला सुरुवात होते. बहुतांश निर्णय द्विधा मनःस्थितीत घेतले जाऊ शकतात. यामुळे अनेकदा घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरू शकतात. त्याचा वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर परिणाम भोगावे लागू शकतात. नुकसान होऊ शकते. 7 / 15त्यामुळे कोणताही निर्णय घेताना किमान दोन वेळा विचार करावा. द्विधा मनःस्थिती झाल्यावर ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे सांगितले जाते. राहुच्या प्रतिकूल प्रभावामुळे नकारात्मकता, नैराश्य यांचा संचार वाढतो. वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर नकारात्मक गोष्टीच सदैव दिसत राहतात.8 / 15एखादी गोष्ट घडत असेल, तरी त्यात नकारात्मकता दिसते. अशावेळी नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्यावर होऊ न देण्याचा प्रयत्न करावा. आशावादी राहावे. सकारात्मक विचार करत राहावा. सकारात्मकता येण्यासाठी आपल्या आराध्य देवतेचे यथाशक्ती नामस्मरण, जप करावा. धार्मिक ग्रथांचे, पुस्तकांचे वाचन करावे, असे सांगितले जाते. 9 / 15राहुसह केतुचा प्रभाव करिअर, कार्यक्षेत्र, आर्थिक आघाडीवर दिसून येतो. राहु प्रभावामुळे वारंवार अडचणी, समस्या, अडथळे अशा आव्हानांचा सामना करावा लागतो. नोकरीत, व्यापार, उद्योग, व्यवसायात चिंता वाढवणाऱ्या घटना घडायला सुरुवात होते, असे सांगितले जाते. 10 / 15मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत निराश, हताश न होता संयम, सामंजस्य, समजुतीने आचार, विचार करावेत. धैर्याने परिस्थिती हाताळावी. काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. नवे विचार घेऊन कार्यरत राहावे. हाती घेतलेले काम उत्तमरितीने कसे करता येईल, यावर भर द्यावा, असे संगितले जाते.11 / 15राहुचा प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावरही पडू शकतो, असे म्हटले जाते. अशा वेळी पचनशक्तीवर याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो. पचनक्रिया मंदावते. अपचनाचे त्रास वाढतात. पोटासंदर्भातील आजार वारंवार डोके वर काढतात.12 / 15अशा परिस्थितीत आहारावर नियंत्रण ठेवावे. पचनाला हलके असतील, अशा खाद्यपदार्थांवर भर द्यावा, असे सांगितले जाते. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास सुरुवातीला छोटी वाटणारी समस्या गंभीर होऊ शकते. त्यामुळे रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा, या उक्तीप्रमाणे आचरण ठेवावे, असे सांगितले जाते.13 / 15राहुचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. मात्र, त्यातील एक उपाय हा सर्वांसाठी अगदी सहज सोपा आहे. तो म्हणजे चंदनाचा वापर. चंदनाच्या वापरामुळे पापकारक ग्रहांचा प्रभाव निष्क्रिय होऊ शकतो, असे म्हटले जाते.14 / 15ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहुसह केतुची महादशा सुरू असेल, त्या व्यक्तींनी पूजा-अर्चा करताना चंदनाचा प्रामुख्याने वापर करावा. चंदनाची अगरबत्ती, धूप यांचा समावेश पूजनात करावा. याशिवाय चंदनाचा समावेश असलेले अत्तर, साबण यांचा वापर करावा. जिथे चंदनाचा वापर करणे शक्य आहे, तेथे तो आवर्जुन करावा. हा उपाय प्रभावशाली मानला जातो. 15 / 15सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, आपणास यासंबंधी सखोल, विस्तृत माहिती हवी असल्यास तज्ज्ञाचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications