शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुचे शनी राशीत गोचर: ७ राशींची लॉटरी, शेअर बाजारात नफा; प्रमोशन-पगारवाढ, अनेक शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 2:44 PM

1 / 11
ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु हे दोन्ही छाया ग्रह आणि क्रूर ग्रह मानले गेले आहेत. या दोन्ही ग्रहांचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पडतो, असे मानले जाते. राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री चलनाने मार्गक्रमण करत असतात. विद्यमान घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत आहे.
2 / 11
एकदा राशीपरिवर्तन केले की, सुमारे दीड वर्ष राहु आणि केतु एकाच राशीत विराजमान असतात. या दोन्ही ग्रहांच्या शुभ दृष्टी असतील, तर रंकाचा राजा होऊ शकतो. परंतु, वक्री दृष्टी झाली तर राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही, अशी मान्यता प्रचलित आहे. पुढील वर्षाच्या मध्यावर हे दोन्ही ग्रह गोचर करणार आहेत.
3 / 11
राहु शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर केतु सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करेल. आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. अशातच राहु शनी राशीत प्रवेश करणे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. याचा काही राशींना सकारात्मक प्रभाव दिसू शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी? जाणून घेऊया...
4 / 11
मेष: राहु गोचर लाभदायक ठरू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. या काळातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक लाभाची चांगली संधी मिळेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक काही मोठे व्यावसायिक सौदे करू शकतात. शेअर बाजार, लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.
5 / 11
वृषभ: राहु अनुकूल सिद्ध होऊ शकते. काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. आर्थिक स्थिती खूप चांगली असणार आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. पगारही वाढू शकतो.
6 / 11
सिंह: फायदेशीर ठरू शकेल. आयुष्याला आकार मिळू शकेल. करिअरच्या दृष्टीकोनातूनही वेळ चांगली राहील. प्रमोशन मिळू शकेल. पगारही वाढू शकेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतता दोन्ही मिळेल. संबंधही चांगले राहतील.
7 / 11
तूळ: जीवनात आनंद तरच येऊ शकतो, तर करिअरमध्ये फायदा होण्याची चिन्हे आहेत. अनेक संधी मिळू शकतात. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. जर बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर त्यात यश मिळू शकते.
8 / 11
धनु: राहु गोचर लाभदायक ठरू शकते. धैर्य आणि शौर्य वाढू शकते. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अनेक महत्त्वाच्या लोकांशी ओळख होईल. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही खूप काही साध्य करण्यात यशस्वी व्हाल. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना काही पद मिळू शकते.
9 / 11
मकर: बरेच फायदे मिळू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशातून व्यवसाय असेल, तर अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. अध्यात्माकडे अधिक कल राहील. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय आणि करिअरमध्ये बरेच फायदे होतील.
10 / 11
कुंभ: विशेष लाभ मिळू शकतो. शनीचाही विशेष आशीर्वाद मिळेल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भौतिक सुख मिळेल. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे होतील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. मालमत्ता, घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. मन प्रसन्न आणि समाधानी राहणार आहे. एखादी मोठी कामगिरी करू शकाल.
11 / 11
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य