शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 9:22 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतु हे क्रूर छाया ग्रह मानले गेले आहेत. एखाद्या राशीत प्रवेश केल्यावर सुमारे १८ महिने राहु केतु त्याच राशीत विराजमान असतात. हे दोन्ही ग्रह कायम वक्री चलनाने गोचर करतात. तसेच एकमेकांपासून नेहमी समसप्तक स्थानी असतात. वर्तमान स्थितीत राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत आहेत.
2 / 9
सर्व नवग्रह राशींसह नक्षत्र गोचरही करत असतात. एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत असतात. आताच्या घडीला राहु उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या तृतीय चरणात आहे. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे. या स्थितीत राहु बलवान होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. राहु आणि शनी यांचे मित्रत्वाचे संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या आगामी काळात राहुसह शनीकृपा प्राप्त होऊ शकते, असे म्हणतात.
3 / 9
ज्योतिषशास्त्रातील काही मान्यतांनुसार, राहु कलियुगाचा राजा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु स्थिती चांगली असेल तर तुम्हाला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून दिलासा मिळू शकतो, असे म्हटले जाते. राहु गोचराचा कोणत्या राशींवर सकारात्मक अनुकूलता देणारा प्रभाव ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ: राहुसह शनीकृपेचा लाभ मिळू शकतो. शेअर मार्केट, लॉटरीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळू शकतो. बरेच आर्थिक लाभ मिळू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. करिअर आणि बिझनेसमधून चांगला नफा मिळू शकतो.
5 / 9
मिथुन: राहुचे नक्षत्र गोचर लाभदायक ठरू शकते. भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घर, वाहन, मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते. शत्रूंवर विजय मिळवाल. पदोन्नती, पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते.
6 / 9
कन्या: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. नोकरदारांचे व्यक्तिमत्व सुधारेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू शकेल. कुटुंबातील सदस्य वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित समस्या परस्पर संमतीने सोडवतील. घरातील वातावरण पुन्हा एकदा अनुकूल होईल.
7 / 9
तूळ: व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळू शकाल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही लाभ मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. अध्यात्माकडे अधिक कल असेल.
8 / 9
मकर: प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. नोकरीमध्ये सुरू असलेल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. समर्पण, मेहनत आणि परिश्रम लक्षात घेऊन काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नोकरीच्या नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात. सुख-शांतता लाभू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यDiwaliदिवाळी 2024