शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुचे शनी नक्षत्रात गोचर: ९ राशींना वरदान काळ, परिश्रमातून यश; परदेशातून लाभ, उत्तम गुरुबळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 5:05 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्रात राहुला मायावी, क्रूर ग्रह मानले गेले आहे. कुंडलीत राहु स्थिती चांगली असेल, तर रंकाचा राजा होऊ शकतो. परंतु, राहुची वक्रदृष्टी किंवा कुंडलीत राहु प्रतिकूल असेल, तर राजाचा रंक होऊ शकतो, असे मानले जाते. विद्यमान स्थितीत राहु ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत आहे.
2 / 12
राहु कायम वक्री चलनाने राशीपरिवर्तन करतो. एका राशीत राहु सुमारे १८ महिने विराजमान असतो. राशीप्रमाणे राहु नक्षत्र गोचर करतो. अलीकडेच राहु शनीचे स्वामित्व असलेल्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात विराजमान झाला आहे. पुढील अनेक महिने राहु याच नक्षत्रात असेल. याचा सर्व राशींवर तसेच देश-दुनियेवर प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जाते.
3 / 12
राहु गुरुच्या राशीत आणि शनीच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे गुरु, शनी आणि राहु या तीनही ग्रहांचा सकारात्मक प्रभाव काही राशींवर पाहायला मिळू शकतो. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक आघाडी यांमध्ये शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 12
मेष: अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात. राहु, गुरु आणि शनीची दृष्टी सकारात्मक ठरू शकेल. काही मोठे बदल दिसू शकतील. लाभाची परिस्थिती निर्माण होऊ शकेल. परदेशातून आर्थिक लाभ मिळू शकतो. परदेशात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. परदेशात जाण्याचे स्वप्न अचानक पूर्ण होऊ शकते. नशिबाची भक्कम साथ लाभू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडू शकतील. खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अध्यात्माकडे अधिक कल असेल.
5 / 12
वृषभ: राहु नक्षत्र गोचराचा काळ खूप चांगला ठरू शकेल. नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल, सकारात्मक जाऊ शकेल. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. काही लोकांना नोकरीत बदल संभवतो. व्यापारी व्यवसाय वाढवू शकतात. आर्थिक लाभ मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील.
6 / 12
मिथुन: राहु नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकेल. उत्पन्नात सुधारणा दिसून येऊ शकेल. भरपूर पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी बदलायची असेल तर ही वेळ चांगली आहे. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कठोर परिश्रम केल्यानंतरच यश मिळू शकेल. नशिबाची साथ लाभेल. नोकरी करत असताना व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.
7 / 12
कन्या: राहु नक्षत्र गोचराचा सर्वाधिक परिणाम दिसून येऊ शकेल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. व्यवसाय विस्तार होऊ शकतो. परंतु, धोरण, रणनीती शेअर करू नका. भागीदारीत केलेल्या व्यवसायात लाभ मिळू शकतो. परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. नशिबाची साथ लाभेल. गुरु आणि राहु प्रभावाने तणाव, चिंता, अज्ञात गोष्टींची भीती किंवा नैराश्य यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांती मिळू शकेल. विचारात बदल होईल. काहीतरी मोठे विचार करून पुढे जाल.
8 / 12
तूळ: विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. कष्टात कोणतीही कसर सोडू नये, तरच नशिबाचे दरवाजे उघडतील. व्यापारी आणि नोकरदारांना विवेकबुद्धीने कार्यरत राहिल्यास यश मिळेल. विचारपूर्वकच कृती करणे लाभाचे आणि हिताचे ठरू शकेल.
9 / 12
वृश्चिक: राहुचे शनी नक्षत्रातील गोचर अनुकूल ठरू शकते. परंतु, कार्यक्षेत्रात जास्त मेहनत करावी लागेल. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना लोकांशी अधिक संवाद साधावा लागेल. सार्वजनिक व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी काळ चांगला आहे.
10 / 12
मकर: या राशीचा स्वामी शनी आहे. तसेच राहुचे शनी नक्षत्रातील गोचर शुभ ठरू शकेल. संयम आणि आत्मविश्वास वाढू शकेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. भावंडांचे, नातेवाईकांचे सहकार्य मिळू शकेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. अडकलेला पैसा मिळू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्यात गती येण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ मिळू शकतात.
11 / 12
कुंभ: राहु नक्षत्र बदल लाभदायक ठरू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. करिअरच्या क्षेत्रात उत्तम मूल्यांकनासोबत बढती आणि मान-सन्मान मिळू शकतो. प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवाल. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकेल.
12 / 12
मीन: विद्यमान स्थितीत राहु याच राशीत आहे. या राशीचा स्वामी गुरु आहे. राहु शनीच्या नक्षत्रात गोचर करत आहे. त्यामुळे गुरु-राहु-शनी या ग्रहांचे पाठबळ मिळू शकते. नोकरीबाबत आळस दाखवू नये. कामाला पूर्ण वेळ द्यावा. मेहनत करून बॉसला खूश करण्याची हीच वेळ आहे. नोकरीत बढती मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य