शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नववर्षारंभात राहु-केतुचे गोचर: ४ राशींना लाभ, परदेशगमन योग; शत्रूवर विजय, बँक बॅलन्स वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 8:51 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानले गेलेले राहु आणि केतु गोचर करत आहेत. नवीन वर्ष २०२४ ला प्रारंभ झाला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी राहु आणि केतु यांनी नक्षत्र गोचर केल्याचे सांगितले जात आहे. राहु आणि केतु एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. विद्यमान स्थितीत राहु मीन राशीत तर केतु कन्या राशीत विराजमान आहेत.
2 / 15
नववर्षाच्या सुरुवातीलाच राहु आणि केतु नक्षत्र गोचर करत आहे. राहु रेवती नक्षत्रातील तिसऱ्या चरणात, तर केतु चित्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे. केतुच्या चित्रा नक्षत्रातील गोचरामुळे न्यायाला चालना मिळू शकेल. अनेक मोठे निर्णय घेतले जातील, असे म्हटले जात आहे.
3 / 15
राहु-केतुचे नक्षत्र गोचर काही राशींना लाभदायक जाणार असून, काही राशींना काहीसे तापदायक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. राहु आणि केतुच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होईल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर या काळात सुटकेचा नि:श्वास सोडाल. आगामी काळ दिलासादायक ठरू शकेल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील. शुक्राच्या स्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत. भागीदारीत काम करणाऱ्यांना आता लाभ मिळू लागतील.
5 / 15
वृषभ: परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. कायमस्वरूपी परदेशात स्थायिक होण्याचा मार्ग खुला होऊ शकेल. स्पर्धा परीक्षा आणि इतर क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल. शत्रूंवर विजय मिळवू शकाल.
6 / 15
मिथुन: प्रेम आणि रोमँटिक संबंधांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. विशेषत: वेब डिझायनिंग इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रगतीची कवाडे खुली होऊ शकतात. मुलांकडून अडचणी येऊ शकतात.
7 / 15
कर्क: आईला त्रास होऊ शकतो. तब्येत बिघडू शकते. शुक्र चांगल्या स्थितीत असेल तर फारसा नकारात्मक प्रभाव जाणवणार नाही. मात्र, घरातील वातावरण अप्रिय बनू शकते, असे म्हटले जात आहे.
8 / 15
सिंह: राहु-केतुमुळे साहस, धैर्य मिळू शकेल. जवळच्या लोकांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. वेळोवेळी समस्या निर्माण होऊ शकतात. प्रियजनांशी संवाद थांबू शकतो. पण, बुध ग्रह अनुकूल असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. लहान भावंडांशी मतभेद संभवतात.
9 / 15
कन्या: राहु आणि केतुमुळे वाणीवर परिणाम होऊ शकतो. बोलणे वा संवाद टोकाचे होऊ शकतात. गैरसमज निर्माण होऊ शकतो. कमाईमध्ये चढ-उतार होऊ शकतात. बचत करणे कठीण होऊ शकते. योग्य दिशेने पावले उचलल्यास गोष्टी अधिक चांगल्या होतील.
10 / 15
तूळ: संशोधनाभिमुख आणि सर्जनशील कार्य करू शकाल. प्रामाणिक आणि वास्तववादी मूल्यांकन आणि निर्णय घेऊ शकाल. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे कोणत्याही समस्येवर सर्जनशील उपाय शोधू शकाल. मात्र, केतुमुळे आत्मकेंद्रित आणि आक्रमकपणा येऊ शकेल. अत्यंत बुद्धिमान लोक उत्तम संशोधन करू शकतात.
11 / 15
वृश्चिक: या काळात जर इतर ग्रहांची स्थिती अनुकूल राहिली तर खूप आध्यात्मिकता येऊ शकते. धार्मिक मार्गाकडे कल दिसून येईल. परदेशात जाण्याचा किंवा परदेशातून नफा मिळविण्याचा मार्ग खुला करेल. शुक्र किंवा बुधाची स्थिती प्रतिकूल असेल तर परदेशातील कामातून नुकसान होऊ शकते.
12 / 15
धनु: शुक्र चांगल्या स्थितीत असेल तर, केतुचा शुभ प्रभाव आर्थिक लाभ देईल. राहु आणि केतु आर्थिक बाबतीत पूर्ण सहकार्य करतील. भरपूर संपत्ती जमा करू शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कठोर परिश्रम करून अनेक यश मिळवाल. बँक बॅलन्सही वाढण्याची शक्यता आहे.
13 / 15
मकर: चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे हुशारीने काम कराल. वडिलांसोबत काही विषयावर वाद किंवा समस्या असू शकतात. व्यवसायात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करताना दिसतील. प्रगती करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक चिंता असू शकते. पैसे कमवण्याचा प्रयत्न कराल. करिअरमध्ये यशस्वी होऊ शकाल.
14 / 15
कुंभ: व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मेहनत कराल, पण पैसे वाचवण्यात अयशस्वी होऊ शकता. व्यवसायातही प्रगती होईल. वडिलांमधील अंतर संपेल. अध्यात्माकडे अधिक कल वाटू शकतो. लांबच्या आध्यात्मिक प्रवासाला जाऊ शकता.
15 / 15
मीन: या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. केतु प्रभावामुळे समस्या, अडचणी येऊ शकतात. वाहनाचा वापर जपून करणे आवश्यक आहे. शुक्र आणि मंगळ प्रतिकूल स्थितीत असतील तर अडचणी वाढू शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य