शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहु-केतुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना दिलासादायक, शुभ-लाभ; कोणाच्या जीवनात उलथापालथीचा काळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 7:07 AM

1 / 15
नवग्रहांचा गुरु मानल्या गेलेल्या बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाने अलीकडेच भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. यानंतर आता ज्योतिषशास्त्रानुसार, छाया आणि क्रूर ग्रह मानले गेलेले राहु आणि केतु नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. राहु-केतुच्या नक्षत्र गोचराचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 15
राहु-केतुची कुंडलीतील स्थिती अनेक गोष्टींवर प्रभावकारक असते, असे सांगितले जाते. आताच्या घडीला राहु मेष राशीत विराजमान असून, केतु तूळ राशीत आहे. प्रतिकूल मानले गेलेले राहु-केतु आपल्या नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत आहेत. राहु-केतु हे नेहमी वक्री चलनाने मार्गक्रमण करतात. राहु अश्विनी नक्षत्रात तर केतु चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
3 / 15
राहु-केतुचे नक्षत्र परिवर्तन काहींच्या जीवनात उलथापालथ करणारे ठरू शकते, तर काही राशीच्या व्यक्तींना याचा अपार लाभ होऊन शुभ प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. करिअर, नोकरी, कार्यक्षेत्र, आर्थिक आघाडीवर राहु-केतुचे नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशींसाठी कसे ठरू शकेल? मेष ते मीन या सर्व राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर दिलासादायक ठरू शकते. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतील. करिअरमध्ये चांगल्या संधींची दारे उघडू शकतील. प्रेमात असलेल्यांचे नाते मजबूत होऊ शकेल. विद्यार्थ्यांना या काळात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित समस्या कमी होऊ शकतील.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर सुखकारक ठरू शकेल. आनंद आणि लाभ मिळू शकेल. घरातील वातावरण आनंददायी असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. मेहनतीचे फळ मिळू शकेल आणि शुभ प्रभाव वाढू शकतील.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. नकारात्मकता वाढू शकेल. समस्या, आव्हानांचा सामना करावा लागू शकेल. संततीमुळे वादाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खडतर ठरू शकतो. प्रेमात असलेल्यांसाठी समस्या वाढू शकतील.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. आई-वडिलांशी वाद, मतभेद होऊ शकतात. संबंध तणावग्रस्त होऊ शकतात. मात्र, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती सामान्य राहू शकेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला जात आहे. विचारपूर्वक खर्च करावा.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. कुटुंबात वाद, मतभेदामुळे तेढ होऊ शकते. परस्पर संबंधांवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असली तरी अतिशय काळजीपूर्वक खर्च करणे आवश्यक आहे.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. वाणीची तीव्रता, आक्रमकता यांमुळे नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आर्थिक समस्या वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे विचार करूनच बोलावे. शब्द काळजीपूर्वक वापरा.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकेल. संबंध सुधारतील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. संशोधनात चांगले परिणाम मिळू शकतील.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरू शकेल. जीवनात सकारात्मक बदल घडू शकतील. मन अध्यात्मात गुंतून जाईल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तिथे स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर ती योजना यशस्वी होऊ शकते.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर लाभदायक ठरू शकेल. केतुच्या चित्रा नक्षत्रातील गोचरामुळे आर्थिक लाभ होऊ शकतील. राहणीमान सुधारू शकेल. पैशांची बचत करण्यातही यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकाल.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. समस्या उद्भवू शकतात. प्रतिष्ठा खराब होऊ शकते. कुटुंब आणि वडिलांशी संबंध बिघडू शकतात. व्यवसायात कष्ट करूनही तितके फळ मिळणार नाही. तणाव वाढू शकतो. कष्टाने कमावलेल्या पैशांची बचत करणे काही प्रमाणात शक्य होऊ शकते.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकेल. जीवनावर शुभ प्रभाव पडू शकेल. कौटुंबिक सुख-समृद्धी वाढू शकेल. मेहनतीचे फळ यशाच्या रुपात मिळेल. धनसंचय वाढू शकेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना राहु-केतुचे नक्षत्र गोचर समस्याकारक ठरू शकेल. आजारपण येऊ शकते. काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. सर्वकाही सतर्क, सावधानतेने करावे, असा सल्ला दिला जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य