शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 7:00 AM

1 / 11
ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु हे दोन्ही क्रूर छाया ग्रह मानले गेले आहेत. राहु आणि केतु कायम वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह कायम एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. राशींप्रमाणे हे दोन्ही ग्रह नक्षत्र गोचरही करत असतात.
2 / 11
राहु आणि केतु यांच्या राशीपरिवर्तन किंवा नक्षत्र गोचराचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पडतो, असे सांगितले जाते. आताच्या घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत आहेत. जुलै महिन्यात राहु शनीचे स्वामित्व असलेल्या उत्तराभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
3 / 11
राहुच्या नक्षत्रबदलाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. नोकरी, करिअर, व्यापार यांसह जीवनाच्या अनेक आघाड्यांवर सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. आर्थिक आघाडीवर फायदा मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जाते. ७ राशी कोणत्या? जाणून घेऊया...
4 / 11
मेष: आत्मविश्वासाने परिपूर्ण असू शकाल. लक्ष्मी देवीच्या कृपेने आर्थिक लाभ होऊ शकतील. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात मान-सन्मान वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.
5 / 11
वृषभ: राहुचा नक्षत्रबदल लाभदायक ठरू शकतो. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी ताळमेळ चांगला राहील. कामे सहज पूर्ण कराल. बॉस कामावर खूश असेल. कार्यशैली सुधारेल. शेअर बाजार, लॉटरीमध्येही नफा मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात.
6 / 11
मिथुन: मानसिक शांततेचा अनुभव घेऊ शकाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्न वाढू शकेल. संचित संपत्ती वाढू शकेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
7 / 11
सिंह: घरात धार्मिक कार्ये होतील. मुलांच्या आनंदात वाढ होईल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. मनात शांतता आणि आनंदाची भावना राहू शकेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. अतिउत्साह टाळावा. आई किंवा कुटुंबातील ज्येष्ठ महिलेकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, पण स्थान बदलाची शक्यता आहे.
8 / 11
तूळ: राहुचा नक्षत्रबदल करिअर आणि नोकरीमध्ये सकारात्मक परिणाम देऊ शकेल. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आदर वाढेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहू शकेल. व्यापारी असाल तर गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. नवीन स्त्रोतांकडून पैसे कमविण्याची संधी मिळेल. प्रत्येक कामात नशिबाने साथ दिल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
9 / 11
मकर: राहुचा नक्षत्रबदल फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीही काळ चांगला राहील. वाहन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते.
10 / 11
कुंभ: राहुचा नक्षत्रबदल शुभ ठरू शकतो. करिअर वाढीच्या अनेक संधी मिळतील. बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील ज्यामुळे करिअर वाढेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. एखाद्याला इच्छित ठिकाणी ट्रान्सफर मिळू शकते. वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा खूप चांगले होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यापारी वर्गाला चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात.
11 / 11
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य