Rahu Nakshatra Parivartan 2022: Rahu Nakshatra Gochar will have adverse effect on four zodiac signs!
Rahu Nakshatra Parivartan 2022: 'बचके रहना रे बाबा; राहू नक्षत्र गोचरचे चार राशींवर होणार प्रतिकूल परिणाम! By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:17 PM1 / 6सध्या पुढील चार राशींसाठी रावाचा रंक होईल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. सदैव मागे राहणारा राहू कृत्तिका नक्षत्र सोडून भरणी नक्षत्रात दाखल झाला असून त्याचा परिणाम काही लोकांच्या जीवनावर नकारात्मक होऊ शकतो.2 / 6२९ एप्रिल रोजी राहूने कन्या राशीत प्रवेश केला होता. १४ जून रोजी राहू स्थल परिवर्तन करत आहे. हे स्थलांतर पुढील आठ महिने दिसून येईल. भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र असून तो राहूचा मित्र ग्रह आहे. याशिवाय राहू आणि शुक्र देखील यावेळी मेष राशीत संयोग करत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि शुक्राचे हे संयोग जरी शुभ असले तरी काही राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. त्यादृष्टीने पुढील राशींनी सतर्क राहायला हवे. 3 / 6 भरणी नक्षत्रात राहूचा प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ म्हणता येणार नाही. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. नावडत्या ठिकाणी किंवा क्षेत्रात बदली होऊ शकते. वडिलांसोबत वाद किंवा मतभेद होऊ शकतात. हा काळ थोडा अडचणीचा राहील. ध्यानधारणा, नामस्मरण, उपासना याद्वारे मन शांत ठेवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करा, परिस्थिती निवळेल. 4 / 6राहूच्या नक्षत्र बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळणार नाहीत. अपघाताचे प्रसंग ओढवू शकतील, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत या दृष्टीने पैशांची तजवीज करून ठेवा, तीच भविष्यात कामी येईल. करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. हा काळ तुमच्या संयामाची परीक्षा पाहणारा ठरेल. डोकं शांत ठेवून वेळोवेळी अचूक निर्णय घेतले तर तुम्ही त्या अडचणींवर मात करू शकाल. 5 / 6राहूच्या स्थितीत बदल झाल्यामुळे मकर राशीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला जीवनाच्या विविध आघाड्यांवर संघर्ष करावा लागू शकतो. नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार असाल तर तिथे रुळेपर्यंत अनेक समस्या आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. मात्र तुमची जिद्द आणि संघर्ष करण्याची वृत्ती या परिस्थितीतून तुम्हाला यशस्वीपणे बाहेर काढू शकते. संयम ठेवा, सगळे ठीक होईल. 6 / 6मीन राशीच्या लोकांसाठी राहूच्या नक्षत्रातील बदल आर्थिक दृष्टिकोनातून ठीक आहे, परंतु वैयक्तिक जीवनात अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. तुम्हाला आयुष्यातील चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नवीन आव्हाने उभी राहू शकतात. अशा वेळी मनाची चंचलता न ठेवता वादापेक्षा नात्यांना प्राधान्य देणे केव्हाही उचित ठरेल. आर्थिक प्रगती झाली की कौटुंबिक प्रश्नही मार्गी लागतील. आणखी वाचा Subscribe to Notifications