शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२३ ला ‘या’ ४ राशींना राहु काळ! राहावे सतर्क, सावधान; वक्री चलनाचा पडेल प्रतिकूल प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 3:01 PM

1 / 9
राहु आणि केतु हे क्रूर, मायावी आणि छाया ग्रह मानले जातात. राहु आणि केतु नेहमी वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात आणि सुमारे १८ महिने एका राशीत विराजमान राहतात.
2 / 9
राहु आणि केतु हे ग्रह एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुभ स्थानी असतील, तर प्रचंड लाभ देऊ शकतात. मात्र, प्रतिकूल स्थानी असतील, तर राजाचा रंक व्हायलाही वेळ लागत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. सन २०२३ मध्ये हे दोन्ही ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत.
3 / 9
आताच्या घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत आहेत. तर सन २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात हे दोन्ही ग्रह वक्री चलनाने अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील. पैकी राहुच्या राशीपरिवर्तनाचा काही राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो, तर काही राशीच्या व्यक्तींना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
4 / 9
राहुच्या राशीपरिवर्तनामुळे काही राशीच्या व्यक्तींच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे सतर्क आणि सावधान राहून कामे केल्यास उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशींसाठी राहुच्या राशीपरिवर्तनानंतरचा काळ प्रतिकूल ठरू शकतो, ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना राहुचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकते. आगामी काळात नकारात्मक विचार मनात घर करू शकतात. खर्चात वाढ होऊ शकते, यामुळे आर्थिक आघाडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बजेटची विशेष काळजी घेऊन खर्च करावा लागेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरीने काही पाऊल उचला. जवळच्या व्यक्तीशी तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यर्थ धावपळ करावी लागू शकेल.
6 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना राहुचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकते. खर्चात वाढ होऊ शकते. त्याचा थेट प्रतिकूल प्रभाव आर्थिक स्थितीवर होताना दिसू शकतो. विनाकारण अधिक खर्च होऊ शकतो. तुमच्या बजेटची काळजी घ्या. कामात विलंब होऊ शकेल. तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. या सर्व परिस्थितीत तुमचे मन थोडे अस्वस्थ आणि उदास राहील.
7 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना राहुचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकते. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश येईलच असे नाही. नकारात्मकता वाढू शकेल. लाभ आणि नफा कमी होण्याची शक्यता असते. अधिक संघर्ष करावा लागू शकतो. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांशी वाद होऊ शकतो. आप्तेष्टांकडून अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना राहुचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकते. कामासाठी अतिरिक्त धावपळ करावी लागू शकते. व्यापारी वर्गासाठीही काळ अनुकूल नाही. खूप संघर्ष करावा लागू शकतो. एखाद्या नातेवाईकाशी भांडण होऊ शकते. खर्च वाढू शकतील. त्याचा प्रभाव आर्थिक आघाडीवर होऊ शकेल.
9 / 9
राहुसह केतुही वक्री होणार असून, याचाही काही राशींवर प्रभाव दिसून येऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य