शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुचा मीन प्रवेश: ५ राशींना लाभ लाभ, ७ राशींना ताप; तुमच्यावर कसा असेल १८ महिने प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 4:34 PM

1 / 15
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अत्यंत महत्त्वाचा राशीबदल होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, छाया आणि क्रूर ग्रह मानला गेलेला राहु ग्रहाने वक्री चलनाने मेष राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. राहुचा मीन प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला गेला आहे. देश-दुनियेसह राहुचा मेष ते मीन सर्व राशींवर प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे.
2 / 15
एका राशीत राहु सुमारे १८ महिने विराजमान असतो. त्यामुळे राहुचा प्रभाव त्या राशीसह अन्य सर्व राशींवर या काळात पडतो, असे सांगितले जात आहे. राहु ग्रहासह केतु ग्रहाने तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश केला आहे. राहु आणि केतु कायम वक्री चलनाने मार्गक्रमण करून राशीपरिवर्तन करत असतात, तर हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात.
3 / 15
राहु ग्रहाच्या मीन प्रवेशाने गुरु आणि राहुचा गुरु चांडाल योग समाप्त झाला आहे. दिवाळीपूर्वी राहुचे झालेले राशीपरिवर्तन अनेक राशींना लाभदायक मानले गेले आहे. तर काही राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. काही राशींवर लक्ष्मी देवीची कृपा होऊन दीपावली अगदी धडाक्यात साजरी होऊ शकते, तर काही राशींना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमची रास कोणती? तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...
4 / 15
मेष: राहुचा मीन प्रवेश अत्यंत शुभ फल देणारे मानले जाते. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअर आणि व्यवसायात काही उत्कृष्ट ऑफर मिळू शकतात. आरोग्य सुधारेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. कार्यालयात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत फायदा होईल.
5 / 15
वृषभ: राहुचा मीन प्रवेश जीवनात सकारात्मकता आणू शकेल. कामात आत्तापर्यंत आलेले अडथळे दूर होऊ शकतात. अचानक पैसे मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत लाभ होतील. करिअरमध्ये काही सुवर्ण संधी मिळू शकतात. यावेळी एखाद्याला दिलेली कर्जाऊ रक्कम परत मिळू शकते.
6 / 15
मिथुन: राहुचा मीन प्रवेश विशेष लाभदायक ठरू शकेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. ऑफिसमध्ये काम करण्यासाठी चांगले वातावरण मिळेल. करिअरच्या संदर्भात इतर एखाद्या संस्थेकडून इच्छित ऑफर मिळू शकते. ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते. त्यात स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.
7 / 15
कर्क: राहुचा मीन प्रवेश शुभफलदायी ठरू शकेल. आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. धैर्य आणि शौर्य वाढेल. मेहनतीचे फळ व्यवसायात यशाच्या रूपाने मिळेल. काही अडकलेले पेमेंट मिळू शकते. कार्यालयातील प्रत्येक बाबतीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
8 / 15
सिंह: राहुचा मीन प्रवेश आगामी काळात काहीसा संमिश्र ठरू शकेल. करिअरमध्ये काही चढ-उतारांनाही सामोरे जावे लागू शकते. नशिबावर विसंबून राहू नका आणि प्रयत्न करत राहा. वडिलांसोबतच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या.
9 / 15
कन्या: राहुचा मीन प्रवेश जीवनात यशकारक ठरू शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरशी संबंधित बाबींमध्ये अनपेक्षित फायदा अपेक्षित आहे. उत्पन्न वाढेल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळतील. व्यवसायात चांगला परतावा मिळेल. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल.
10 / 15
तूळ: राहुचा मीन प्रवेशाने जीवनात बरेच चढ-उतार येऊ शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे आवश्यक आहे. आपण सर्वकाही काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. आरोग्याबाबत गंभीर समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील संबंध एखाद्या समस्येमुळे बिघडू शकतात. कोणत्याही प्रकारचे वादविवाद आणि भांडणे टाळा. कामावर लक्ष केंद्रित करा.
11 / 15
वृश्चिक: राहुचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही नवीन प्रकल्पावर किंवा कोणत्याही करारावर काम न करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते. व्यवसायात भागीदाराशी भांडण होऊ शकते. कोणत्याही मुद्द्यावर मोकळेपणाने बोलले तर बरे होईल.
12 / 15
धनु: राहुचा मीन प्रवेश काहीसा समस्याकारक ठरू शकेल. करिअरमध्ये काही प्रकारच्या तणावाचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा काळ चांगला असून, जीवनात शुभ प्रभाव वाढतील. विद्यार्थ्यांना एकाग्रता राखण्यात त्रास होईल. कुटुंबात काही तणाव असू शकतो. परस्पर संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
13 / 15
मकर: राहुचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. अनेक बाबतीत द्विधा मनःस्थिती निर्माण होऊ शकते. करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणत्याही बाबतीत अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. सावधगिरी बाळगा. व्यवसायात जोखीम पत्करून पुढे गेल्यास फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
14 / 15
कुंभ: राहुचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आयुष्यात अनेक चढ-उतार येऊ शकतात. खूप व्यस्त असाल. खूप धावपळ करावी लागेल. ऑफिसमधील कोणीतरी विरोधात कट रचू शकतो. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सक्रिय असाल. पैसे कमवण्याची इच्छा वाढेल. काही समस्या आणि संघर्ष वाढू शकतात.
15 / 15
मीन: राहुचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल.राहु आणि केतुमुळे आयुष्यात अनेक समस्या वाढू शकतात. कौटुंबिक सदस्यांसोबतचे संबंध प्रभावित होऊ शकतात. बोलण्याने त्यांना त्रास होऊ शकतो. आर्थिक बाबतीतही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. काही अनावश्यक खर्चामुळे इतर महत्त्वाचे काम प्रभावित होऊ शकते. व्यावसायिकांना अडकलेल्या पैशामुळे मनोधैर्य खचू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य