शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' चार राशींवर पडणार राहूची दृष्टी; घाबरू नका फक्त बाळगा थोडीशी काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 2:22 PM

1 / 5
राहू आणि केतू यांचा प्रभाव ग्रहस्थितीला अनुकूल नसेल तर ग्रहदशा बिघडू शकते, परिणामी आपल्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. राहू १२ एप्रिल २०२२ रोजी आपली राशी बदलणार आहे. आपण म्हणाल एप्रिल सुरू व्हायला अजून बराच अवधी असतानाही आतापासून राहूची दहशत का? कारण, राहुकाळातील त्रास आणि नुकसान टाळण्यासाठी आतापासूनच काही उपाय करता येतील. त्यासाठी ही पूर्व तयारी.
2 / 5
राहूचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी क्लेशदायक परिस्थिती निर्माण करू शकते. ते एखाद्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे शारीरिक किंवा मानसिक वेदना होऊ शकतात. यासाठी त्यांनी जिभेवर ताबा ठेवणे चांगले. शिवाय मनःशांती साठी त्यांनी आतापासून ध्यानधारणेचा पर्याय निवडावा.
3 / 5
वृषभ राशीच्या लोकांनाही राहूचे संक्रमण वाईट परिणाम देणारे ठरू शकते. त्यांचा खर्च वाढेल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. त्यादृष्टीने आर्थिक पूर्वनियोजन करा. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीचा मार्ग स्वीकारा. शक्य झाल्यास रोज जेवणाआधी कावळ्याला किंवा कुत्र्याला पोळीचे तुकडे घाला.
4 / 5
राहूचे संक्रमण धनु राशीत जन्मलेल्या लोकांसाठी वैवाहिक अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यावर उपाय हाच की जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवल्यास हा कठीण काळ सहज निघून जाऊ शकेल. याच बरोबर आपण आपल्या उपास्य देवतेची उपासना वाढवली पाहिजे, त्यामुळे राहूचे प्राबल्य कमी होईल.
5 / 5
मकर राशीचे स्वामी शनी देव आहेत. तरी देखील राहू काळ त्यांना त्रासदायक ठरू शकतो. नोकरी व्यवसायात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. या काळात धैर्याने सामोरे गेल्यास आगामी काळ आनंद दायी ठरू शकतो. यासाठी आपण शनी आणि मारुती उपासना वाढवावी.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष