शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakhi Sawant: राखीचा आक्रोश, वारंवार प्रेमभंगाचे प्रसंग, पण आणखी किती काळ? ज्योतिष तज्ञांनी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 5:45 PM

1 / 7
'मी नवऱ्याच्या घरात राहिले तर उद्या फ्रिजमध्ये सापडायचे', असे पत्रकारांना सांगत राखी सावंतने श्रद्धा मर्डर केसचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. बोलता बोलता अचानक ती बेशुद्ध झाली. तिला अशा अवस्थेत पाहून नेटकऱ्यांनी तिचे सांत्वन केले. आपल्या दुःखावर आवर घालत राखी सांगत होती, 'हे माझ्याबाबतीत पहिल्यांदा घडले नाही. याआधीही प्रेमात माझी फसवणूक झाली. आदिलशी लग्न केल्यावर सुखाने संसार करण्याचा मानस होता, मात्र आमचे नाते आता तुटण्याच्या स्थितीत आले आहे. राखीच्या नशिबाने तिची पुन्हा साथ सोडली आहे.
2 / 7
राखीच्या सांगण्यानुसार आदिलचे पहिले लग्न २०१९ मध्ये झाले होते, परंतु ते ३ वर्षच टिकले. २९ मे २०२२ मध्ये राखी आणि आदिलचा निकाह झाला. वास्तविक ही बातमी उशिराने लोकांपर्यंत पोहोचली. पण उशीर एवढा झाला की राखीची लग्नवार्ता कळता कळताच काडीमोड होत असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना ऐकावी लागली. याचा अर्थ राखीचे ग्रह ठीक नाहीत? कुंडली दोष आहे? तिच्या भाग्यात वैवाहिक सुख नाही? की आगामी काळात काही तिच्या नशिबात चांगले वाढून ठेवले आहे? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
3 / 7
राखी सावंतच्या आयुष्यात घडत असलेला प्रकार पाहता तिच्या कुंडलीचे सातवे स्थान अर्थात वैवाहिक जीवनाचे स्थान अनुकूल स्थिती दर्शवत नाही. तिच्या कुंडलीत विवाह घराचा स्वामी शुक्र केतूसोबत अकराव्या घरात विराजमान आहे. हे शुभ लक्षण नाही. प्रेम स्थानात म्हणजेच कुंडलीच्या पाचव्या घरात ग्रहांचा वाईट संयोग आहे. त्यामुळेच राखीला वारंवार प्रेमभंगाचे दुःख पचवावे लागत आहे.
4 / 7
राशीच्या पंचम स्थानात राहूशी भाग्येश गुरूच्या संयोगामुळे ज्याला प्रेमाचे घर म्हटले जाते, त्याठिकाणी कुंडलीत चांडाळ योग तयार होत आहे. तसेच, कुंडलीपासून प्रेम घरात ग्रहण योग आहे, जो त्यांचे नाते पूर्ण होऊ देत नाही. त्यामुळे नाते ठरते, जुळते आणि तुटते अशी बिकट परिस्थिती राखीवर ओढवत आहे.
5 / 7
प्रेम निभवण्याचा, लग्न टिकवण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करते, पण राहु तिच्या प्रेमाला ग्रहण लावत आहे. त्यामुळे तिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. राखीचे यापूर्वीचे लग्न मंगळ ग्रह सूर्याच्या दशेमध्ये असताना मोडले होते. २०२० पासून तिला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पण ही स्थिती कायम राहणार का? ज्योतिष तज्ज्ञ सांगतात-
6 / 7
सध्या तयार होत असलेल्या ग्रहांच्या स्थितीवरून २०२५ पर्यंतचा काळ तिच्या आयुष्यात खूप कठीण काळ राहील. मानसिक आणि शारीरिक त्रास देईल. आर्थिक स्थितीदेखील नाजूक असेल. करिअर बाबतीत सांगायचे तर तिच्या कुंडलीमध्ये केतू शुक्र ग्रहासोबत अकराव्या घरात असल्यामुळे प्रसिद्धी योग तिच्या वाट्याला आला. मात्र अति स्पष्टवक्तेपणा, बोल्ड इमेज आणि उथळ वागणुकीमुळे ती कुप्रसिद्ध ठरली.
7 / 7
चित्रपट सृष्टीत विवाह संबंधांवर आधारित वेगवेगळ्या बातम्या कानावर पडतात. राखीच्या बाबतीतही तेच झाले. मात्र ज्योतिष तज्ञांच्या म्हणण्यानुसार २०२५ नंतर तरी तिचे आयुष्य मार्गी लागेल अशी आशा व्यक्त करूया!
टॅग्स :Astrologyफलज्योतिषRakhi Sawantराखी सावंत