Raksha Bandhan 2024: Tie a Rashi colored thread for brother; Contribute to overall progress!
Raksha Bandhan 2024: भावासाठी राशीला अनुकूल रंगाचा धागा बांधा; सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 1:02 PM1 / 12मेष : मेष राशीच्या भावांना लाल रंगाची राखी बांधा. हा रंग त्यांना उत्साह देईल आणि करिअरमध्ये यशस्वी बनवेल. लाल रंग ऊर्जेचे प्रतीक असल्यामुळे प्रत्येक कामात ती ऊर्जा कामी येऊन प्रगती होत राहील2 / 12वृषभ : वृषभ राशीच्या भावाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा. पांढरा रंग त्यांना लाभदायक ठरेल. हा रंग शांततेचा असून करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखवेल.3 / 12मिथुन : मिथुन राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधा. हा रंग त्यांना उत्साह, चैतन्य प्रदान करेल. हा रंग समृद्धीचा आहे. त्यांच्या आयुष्यात भरभराट व्हावी यासाठी हिरव्या रंगाची राखी शुभ ठरू शकेल.4 / 12कर्क : कर्क राशीच्या भावाला पांढरी किंवा पिवळी राखी बांधली असता ती लाभदायक ठरेल. पांढरा रंग शांततेचा आणि पिवळा रंग उत्साहाचा आहे. पिवळा रंग तेजाचे प्रतीक देखील आहे. रंगाचे गुण भावाच्या आयुष्यात उतरून त्याला प्रगतीपथावर नेतील.5 / 12सिंह : सिंह रास मुळात थोडी संतापी आहे. अशा राशीच्या भावाला खरं तर पांढरी राखी बांधायला हवी. परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की या राशीला लाल-पिवळ्या रंगाची राखी बांधली, तर ती जास्त परिणामकारक ठरेल. हे रंग त्यांना राग नियंत्रणात राखून काम करण्याची सूचना देत राहातील.6 / 12कन्या : कन्या राशीला नारंगी, केशरी रंगाची राखी बांधणे शुभ ठरेल. हा रंग त्यांच्या आयुष्यात शौर्य आणि उत्साह आणेल.7 / 12तूळ : तूळ राशीच्या भावाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा. पांढऱ्या रंगाची शीतलता त्यांच्या आयुष्यात उतरेल आणि शांत डोक्याने व शांत मनाने ते प्रत्येक काम मार्गी लावतील.8 / 12वृश्चिक : वृश्चिक राशीच्या भावाला लाल किंवा गुलाबी रंगाची राखी बांधणे भाग्यकारक ठरेल. हा रंग त्यांना व्यवसायात, नोकरी धंद्यात यश मिळवण्यासाठी मदत करेल.9 / 12धनु : धनु राशीच्या भावांना सोनेरी रंगाची राखी बांधा. हा रंग त्यांच्या आयुष्यात सुखाचे सोनेरी क्षण घेऊन येईल.10 / 12मकर : मकर राशीसाठी निळा रंग शुभ आहे. त्यांना निळी राखी बांधली असता त्यांची करिअर मध्ये प्रगती होत राहील.11 / 12कुंभ : कुंभ राशीचे स्वामी शनी देव असल्याने त्यांना काळा रंग शुभ आहे. परंतु सण उत्सवाच्या प्रसंगी काळा रंग निषिद्ध असल्याने कोणत्याही गडद रंगाची राखी तुम्ही बांधू शकता. गडद रंग त्यांच्या मनगटाला आणि पर्यायाने करिअरला उभारी देणारा ठरेल.12 / 12मीन : मीन राशीसाठी आकाशी किंवा पिवळा हे रंग शुभ ठरतील. या रंगांमुळे त्यांच्या आयुष्यातील चंचलता कमी होऊन स्थैर्य प्राप्त होईल आणि त्यांच्या प्रगतीला वाव मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications