शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raksha Bandhan 2024: देवराखी कशाला म्हणतात? कोणत्या देवाला ती बांधतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 4:05 PM

1 / 5
2 / 5
लोक लक्ष्मीची पूजा करतात आणि तिला मिळवण्यासाठी अट्टाहास करतात. परंतु जे विष्णूंची उपासना करतात, त्यांना आपोआपच लक्ष्मीप्राप्ती होते. कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. या दोहोंचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर विष्णूंची उपासना सुरू करा. रक्षा बंधनाच्या दिवशी विष्णूंना पिवळ्या रंगाची राखी बांधा आणि जगद्पित्याशी बंधुत्व जोडण्याचा प्रयत्न करा.
3 / 5
महादेवाचे कुठेही देऊळ नसते. परंतु त्याची आत्मज्योती ज्यात विसावते, ते म्हणजे शिवलिंग. श्रावण मासात आपण महादेवाची पूजा करतोच, त्याचबरोबर त्यांना निळ्या रंगाची राखी बांधली असता त्या धाग्याची सकारात्मकता आपल्याला दिलासा देत राहील. वाईट गोष्टींचा नायनाट करणारे महादेव आपल्या पाठीशी उभे राहून 'माझ्या कडे देव माझा पाहतो आहे' हा दिलासा देत राहतील.
4 / 5
ज्यांना भाऊ नसतो अशा कितीतरी भगिनी कृष्णाला आपला भाऊ मानून राखी बांधतात. संतांनी देखील वर्णन केले आहे, 'कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारु' सर्वस्व कृष्ण मानणाऱ्या भक्तांना श्रीकृष्ण बंधू रूपातही भेटतो. त्याने ज्याप्रमाणे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी वस्त्र पुरवून तिचे लज्जारक्षण केले, तसा बाका प्रसंग आपल्याही आयुष्यात आला तर कृष्ण पाठीशी उभा राहावा म्हणून कृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधा.
5 / 5
हनुमंताच्या नुसत्या नावाने भूत पिशाच्च निकट येत नाहीत, असे हनुमान चालीसा मध्ये संत तुलसी दासांनी वर्णन केले आहे. असा कणखर भाऊ आपल्याला लाभला, तर कसलेही भय उरणार नाही. आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होत राहील. यासाठी श्रद्धेने हनुमंताला केशरी रंगाची राखी बांधायला विसरू नका.
टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३