शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raksha Bandhan: रक्षाबंधनादिवशी राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणीली रिकाम्या हाती पाठवू नका, येऊ शकते अशी अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 8:25 PM

1 / 8
यंदाच्या रक्षाबंधनाला काही दिवसांचा अवधी उरला आहे. रक्षाबंधनासाठी भाऊ, बहिणी आपापल्या परीने प्लॅनिंग करत आहेत. बहिणी भावांना त्यांच्या आवडीची मिठाई आणि राखी कुठली बांधावी याचा विचार करत आहेत. तर भाऊ बहिणीला कुठलं गिफ्ट द्यायचं याचा विचार करत आहेत.
2 / 8
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनादिवशी राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणीला परत जाताना रिकाम्या हाती जाऊ देऊ नका, अशी चूक केल्यास ती तुम्हाला महागात पडू शकते. बहिणीला रिकाम्या हाती जाऊ दिल्यास त्याचा तुमच्यावर काय परिणाण होणार आहे, ते जाणून घेऊयात.
3 / 8
बहीण ही बुध ग्रहाचं प्रतीक आहे. बुध ग्रहाला नाराज केल्याचा थेट परिणाम मेंदूवर पडतो. घरी आलेल्या बहिणीचा योग्य मान-सन्माम न राखल्यास ती मनातून नाराज झाल्यास त्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होईल. तसेच तुमचा मेंदू योग्य पद्धतीने काम करणे बंद करेल. त्याबरोबरच मानसिक शांतता आणि सुख-समृद्धी निघून जाईल.
4 / 8
रक्षा बंधनाचा सण ११ ऑगस्ट रोजी रात्री भद्रा काळ समाप्त झाल्यानंतर साजरा केला जाईल. भद्राचा प्रभाव असलेल्या काळात कुठलेही बाँडिंग असलेलं काम होऊ शकत नाही. कारण भद्रा हे वेगळे आणि विध्वंस करणारं तत्त्व आहे. तर रक्षाबंधन हा जोडणारा दिवस आहे. त्यामुळे भद्रा काळात भावाने बहिणीला राखी बांधू नये, याची काळजी घेतली जाते.
5 / 8
राखीची खरेदी करताना त्यात काळा रंग असणार नाही याची काळजी घ्या. आजच्या काळात हायटेक राख्या आल्या आहेत. मात्र त्यांच्यासोबतच एक सुती रक्षासूत्र जरूर बांधून घ्या.
6 / 8
बहिणींकडून राखी बांधून घेताना भावांनी त्यांना रिकाम्या हाती ठेवू नये. बहिणीसाठी भेट आणि धन अवश्य द्या. हा सण बहिणींच्या प्रति प्रेम व्यक्त करण्याचा आहे. तसेच मनातील, अज्ञात भयाला ज्ञानाच्या प्रकाशाने भरण्याचा आहे.
7 / 8
तसेच बहिणींनी भावासाठी मिठाईची निवड करताना मिठाईमध्ये रस असेल, याची काळजी घ्यावी, त्यामुळे बहीण-भावामध्ये प्रेमाचा ओलावा कायम राहील. मिठाई ही काळ्या रंगाची नसावी. तसेच औक्षण केल्यावर बहिणीने आपल्या हातांनी भावाला मिठाई भरवली पाहिजे.
8 / 8
तसेच औक्षण झाल्यानंतर परंपरेनुसार नमस्कार करण्याच्या परंपरेचं पालन करावं.
टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिप