शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 7:07 AM

1 / 15
२६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक दुर्मिळ, अद्भूत योग जुळून येत आहेत. या दिवशी रोहिणी नक्षत्र, सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत, तर चंद्र वृषभ राशीत असेल. वृषभ राशीत गुरु असल्याने गजकेसरी योग जुळून येत आहे. तसेच या दिवशी जयंती योग तयार होत आहे.
2 / 15
श्रीकृष्ण जन्मोत्सवाला जुळून आलेले दुर्लभ योग अत्यंत शुभ मानली जात आहेत. या योगात पूजा, उपासना केल्याने अनेक पटींनी अधिक चांगले फल प्राप्त होते. जयंती योगामध्ये उपवास केल्यास शाश्वत पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच या दिवशी या दिवशी शुक्रादित्य, शश राजयोग जुळून येत आहे. वृषभ राशीमध्ये चंद्र उच्च स्थानी असेल. याशिवाय मिथुन राशीमध्ये मंगळ आणि बुधाचा उदय उत्तम मानले गेले आहे.
3 / 15
श्रीकृष्ण जयंती, जन्माष्टमीला जुळून आलेल्या या अद्भू, दुर्लभ, दुर्मिळ योगात तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्यास शुभ पुण्य लाभू शकेल. बाळकृष्णाची कृपा होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? कोणते उपाय करणे श्रेयस्कर ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचे पूजन झाल्यावर गुलाबी रंगाचे वस्त्र अर्पण करावे. या उपायाने समस्या, अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकेल.
5 / 15
वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला बाळकृष्णाला दूध आणि मधाने स्नान करावे, त्यानंतर पिवळ्या चंदनाने तिलक लावावा.
6 / 15
मिथुन: या राशीच्या व्यक्तींनी जन्माष्टमीला बाळकृष्णाला लाल चुनरी अर्पण करावी. असे केल्याने वैवाहिक जीवन तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतील.
7 / 15
कर्क: या राशीच्या लोकांनी शंखातून बाळकृष्णावर अभिषेक करावा. तसेच गोडाचा नैवेद्य दाखवावा.
8 / 15
सिंह: या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला लोणी, खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे भगवान श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि जीवनात सुख-समृद्धी येऊ शकेल.
9 / 15
कन्या: या राशीच्या लोकांनी बाळकृष्णाला गंगाजल अर्पण करावे. तसेच दूग्धाभिषेक करावा. हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. दह्याचा नैवेद्य दाखवावा.
10 / 15
तूळ: या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला कान्हाला दुग्धाभिषेक करावा. चंदन तिलक करावे. लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. खिरीचा नैवेद्य दाखवावा.
11 / 15
वृश्चिक: या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करावी. नैवेद्य म्हणून नारळ बर्फी अर्पण करावी.
12 / 15
धनु: या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला भगवान कान्हाला दही आणि मधाने स्नान घालावे. लाल वस्त्र अर्पण करून पूजन करावे.
13 / 15
मकर: या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला बाळकृष्णावर निरसे दूध घेऊन अभिषेक करावा.
14 / 15
कुंभ: या राशीच्या लोकांनी दूध, गंगाजल आणि मधाने कान्हाचा अभिषेक करावा. बेसनाचे लाडू अर्पण करावेत.
15 / 15
मीन: या राशीच्या लोकांनी जयंतीनिमित्त भगवान श्रीकृष्णाची विधीपूर्वक पूजा करून बर्फी अर्पण करावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक