शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वक्री शुक्र अस्तंगत: ‘या’ ५ राशींना समस्या, आव्हाने; धनहानी संभव, १५ दिवस अखंड सावधान राहावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 1:50 PM

1 / 9
रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह सिंह राशीत विराजमान आहे. काही दिवसांपूर्वी शुक्र सिंह राशीत वक्री झाला आहे. वक्री अवस्थेत असतानाच आता शुक्र अस्तंगत होणार आहे.
2 / 9
एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते.
3 / 9
वक्री असलेला शुक्र ०३ ऑगस्ट रोजी अस्त होत आहे. शुक्र अस्तंगत अवस्थेत सुमारे १५ दिवस राहील. यानंतर १८ ऑगस्ट रोजी शुक्राचा उदय होणार आहे. तत्पूर्वी शुक्र वक्री चलनाने कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
4 / 9
शुक्राचा अस्त आणि वक्री चलन काही राशींना काही प्रमाणात समस्याकारक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. करिअर, आर्थिक आघाडीवर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अचानक समस्या उद्भवू शकतात, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो? जाणून घेऊया...
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना वक्री शुक्राचा अस्त काहीसा संमिश्र ठरू शकतो. विविध पातळींवर चढ-उतारांचा सामना करावा लागू शकेल. करिअर आणि लव्ह लाइफसाठी हा काळ फारसा अनुकूल असेलच असे नाही. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांना काही नुकसान सोसावे लागू शकते. खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. बोलण्यापूर्वी विचार करावा.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना वक्री शुक्राचा अस्त काहीसा संमिश्र ठरू शकेल. एखाद्या गोष्टीवरून नातेवाइकांशी भांडण होऊ शकते. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरमध्ये अनेक चढ-उतार येऊ शकतात. कुटुंबातील काही जवळच्या लोकांशी असलेले संबंध प्रभावित होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही कारणाने अडथळे येऊ शकतात. वैवाहिक जीवनातही अडचणी येऊ शकतात.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना वक्री शुक्राचा अस्त काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. करिअरमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. विनाकारण समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील वादाचे किंवा तणावाचे वातावरण राहू शकते. जोडीदाराशी वाद होऊ शकतात.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना वक्री शुक्राचा अस्त काहीसा संमिश्र ठरू शकेल. शत्रू नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. ऑफिसमधील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेलच असे नाही. आर्थिक बाबतीतही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाचे कामही अडकू शकते. इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मनात राग आणि चिडचिड राहील. जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोला. कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करू नका.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना वक्री शुक्राचा अस्त काहीसा संमिश्र ठरू शकेल. शिक्षण आणि प्रेमाशी संबंधित प्रकरणांमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. प्रेम जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. शैक्षणिक क्षेत्रात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जे उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील होते, त्यांना अचानक अडथळे येऊ शकतात. शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक न करण्याचा सल्ला देण्यात येतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य