शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 8:19 AM

1 / 12
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊत यांना ईडीने अटक केली. विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना सुरुवातीला ०४ ऑगस्टपर्यंत सुनावलेली कोठडी पुन्हा वाढवली आहे. आता संजय राऊत ०८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे.
2 / 12
पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याचा दावा संजय राऊत करत असले, तरी ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात अत्यंत महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत, ज्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात, असे सांगितले जात आहे.
3 / 12
ईडीने जमा केलेले भक्कम पुरावे आणि दोन महत्त्वाचे साक्षीदार यांमुळे संजय राऊत यांच्या अडचणी इतक्यात कमी होतील, अशी शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विरोधकांच्या कुंडल्या हातात ठेवणाऱ्या संजय राऊत यांची कुंडली काय सांगते? मनी लॉंड्रिंग प्रकरणी संजय राऊत का अडचणीत आले? आताचे ग्रहमान काय सांगते? जाणून घ्या...
4 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, संजय राऊत यांचा १५ नोव्हेंबर १९६१ रोजी अलिबाग येथे झाला. संजय राऊत यांची लग्न कुंडली सिंह राशीची आहे. यामध्ये आठव्या स्थानाचा स्वामी गुरु आणि सहाव्या स्थानाचा स्वामी शनी हे दोघेही निगड द्रेष्कोणात आहेत. अशा स्थितीत सर्वार्थ चिंतामणीनुसार, संजय राऊत कुंडलीत अत्यंत प्रतिकूल योग तयार होतो. बृहत जातक संहितेच्या २१ व्या अध्यायात १६ व्या श्लोकात या योगाचे वर्णन ‘बंधन योग’ असे केले आहे.
5 / 12
संजय राऊत यांच्या सिंह लग्नाच्या कुंडलीत शुक्र, बुध आणि सूर्याचा तिसऱ्या स्थानी आहेत. हे स्थान लेखन स्थान म्हणून ओळखले जाते. आपली आक्रमक शैली आणि व्यंग्यात्मक लेखांसाठी ओळखले जाणारे संजय राऊत यांची रास मकर आहे. वक्री चलनाने मकर राशीत आलेला शनी १७ जानेवारी २०२३ याच राशीत असेल. त्यामुळे आगामी काळ हा कठीण आणि कष्टकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
6 / 12
आताच्या घडीला संजय राऊत यांच्या सिंह लग्न कुंडलीत शनीच्या विमशोत्तरी दशेत गुरुची दशा सुरू आहे. ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२४ पर्यंत ही दशा सुरू राहणार आहे. शनी गुरुच्या या दशा काळात सन २०२३ च्या सुरुवातीपर्यंतचा काळ त्यांच्यासाठी प्रतिकूल आहे. या दरम्यान त्यांना न्यायालयीन खटल्यांबाबत अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकेल.
7 / 12
याचे एक प्रमुख कारण म्हणजे सध्या शनी मकर राशीत आहे. चंद्र आणि केतू दोघेही त्यांच्या जन्मपत्रिकेत बसून ग्रहण योग तयार करत आहेत. त्यांच्या कुंडलीत मकर राशीच्या स्थानी शनी आणि गुरू आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा न्यायालयीन लढा द्यावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे.
8 / 12
एप्रिल २०२४ नंतर बुध ग्रहाची महादशा त्यांच्यासाठी अनुकूल राहील. यावेळी त्यांना 'मनी लाँडरिंग' प्रकरणात न्यायालयीन खटल्यांमध्ये दिलासा मिळू शकतो. संजय राऊत यांना कुंडलीत गुरुच्या पाचव्या घरातील सहाव्या भावात 'नीच भंग' योग असल्यामुळे त्यांचे लेखन कार्य अखंड चालू राहील, असे सांगितले जात आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
9 / 12
दरम्यान, संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ झालेली असतानाच आता ईडीने आपला मोर्चा त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याकडे वळवल्याचे सांगितले जात आहे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना समोरासमोर बसवून ईडीचे अधिकारी चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
10 / 12
ईडीने वर्षा राऊत यांची तब्बल ९ तास चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला तीन पुराव्यांच्या आधारे संजय राऊत यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली होती. तब्बल ९ तासांनंतर संजय राऊत सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. यानंतर सुमारे ७ ते ८ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना अटक दाखवण्यात आली.
11 / 12
पत्राचाळ पुनर्विकासातून कमावलेला बेहिशेबी नफा, यातील कोट्यवधीची रक्कम निकटवर्तीयांच्या खात्यात वळवणे, याच पैशातून संजय राऊत यांनी दादरमधील फ्लॅट घेतलाय, तसेच यातील रकमेतूनच अलिबागमध्ये अनेक जमिनी खरेदी, प्रवीण राऊतांकडून मिळालेला पैसा कसा आणि कुठे वापरला याचा शोध ईडीने घेतलाय.
12 / 12
याशिवाय, वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्या कंपनीत अवघे काही हजार रुपयांची गुंतवणूक करून वर्षभरात लाखो लाखोंची कमाई केली आहे. ईडीची सर्वांत मोठी भक्कम बाजू म्हणजे प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिलेला जबाब असून, संजय राऊतांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ