Sankashti Chaturthi 2023: संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी फेकू नका दुर्वांची जुडी; करा ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 13:55 IST
1 / 6अधिक मासात ४ ऑगस्ट रोजी संकष्ट चतुर्थी असून रात्री ९. ३२ मिनिटांनी चंद्रोदय असणार आहे. दिवसभर उपास करून चंद्र दर्शन घेतल्यावर बाप्पाला नैवेद्य दाखवून सहकुटुंब त्याची आरती म्हणून मग उपास सोडण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. याबरोबरच संकष्टीच्या दिवशी दिलेले उपाय केल्यास त्याचा तुम्हाला निश्चितच लाभ होऊ शकेल. 2 / 6ज्योतिष शास्त्रानुसार अधिक मासातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला २१ दूर्वांसह शमीची पाने अर्पण करा. गणेशाला शमी प्रिय असल्याने ती आठवणीने वाहिल्यास गणेशही आपली मनोकामना पूर्ण करतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते.3 / 6संकष्टीला हळदीमध्ये शेंदूर मिसळून गणेशाला त्या गंधाचा टिळा लावावा. गणेशाला मारुती रायाप्रमाणे शेंदूर प्रिय असल्याने हे गंध त्याला आवडते. आपणही तो टिळा आपल्या कपाळावर लावावा. डोकं शांत राहते आणि गणेश कृपेने यश प्राप्ती होऊन सर्व संकटं दूर होतात. 4 / 6संकष्टीला गणेशाचे आवडते मोदक करणार असाल तर देवघरात मोदकांचा नैवेद्य दाखवा, शिवाय एक मोदक गणेश मंदिरात ठेवा तसेच एखाद्या लहान मुलालाही द्या. मोदक खाऊन त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदामुळे तुम्हाला पुण्य लाभेल आणि तुमच्याही आयुष्यात आनंद, सुख, समृद्धीचा प्रवेश होईल . 5 / 6गणरायाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांचा हार अर्पण करा. संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी त्या हातातील दुर्वांची जुडी कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या खिशात ठेवायला द्या. पुढच्या संकष्टीला जुनी जुडी बदलून नवीन जुडी संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी काढून पाकिटात ठेवा. असे केल्याने करिअर, शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामध्ये भरघोस यश मिळते!6 / 6 गणेशाला वाहिलेली जास्वदांची फुले निर्माल्यात टाकून न देता आपल्या घरातल्या रोपांच्या कुंडीमध्ये टाका. कालांतराने त्याचे खत होईलच, पण गणेशाच्या सहवासातले ते पुष्प घरातील सकारात्मकता वाढवण्यास कारणीभूत ठरेल.