शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sankashti Chaturthi 2024: संकष्टीच्या मुहूर्तावर त्रिग्रही योगाचा शुभ संयोग; ५ राशींवर बापाच्या कृपेचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 11:20 AM

1 / 6
बुधवारी २१ तारखेला चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत जात असून सिंह राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. तसेच उद्या भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी त्रिग्रही योगासह सुकर्म योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग असल्याने या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. हा कल्याणकारी योग केवळ शुभवार्ता घेऊन येणारा नाही तर इच्छित मनोकामनापूर्ती करणारा ठरेल. त्यासाठी गणेश भक्तांनी नशिबाला आपल्या कर्तव्याची, प्रामाणिकतेची आणि उपासनेची जोड द्यायची आहे.
2 / 6
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल, ज्यामुळे तुमची विचारसरणी देखील बदलेल. तुमच्या उत्पन्नात आणि संपत्तीत वाढ होईल आणि तुम्ही प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना कराल. करिअरची व्याप्ती वाढेल आणि नवीन नोकरीच्या चांगल्या संधीही मिळतील. त्याच वेळी, जर नशीब उद्या व्यावसायिकांना अनुकूल असेल तर त्यांना चांगला नफा मिळू शकेल आणि तुमची ओळख एक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती म्हणून होईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय वेळ घालवाल आणि प्रत्येक निर्णयात तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक चिंता दूर होतील आणि सर्व सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतील.
3 / 6
सिंह राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा असेल, ज्यामुळे त्यांना जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेचा विकास होईल, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेऊ शकाल आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल.कामाच्या ठिकाणी शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल आणि आपल्या कामाने सर्वांना प्रभावित कराल. व्यावसायिकही त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक नफा कमावतील. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडतील. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल आणि मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक लाभदायी ठरेल.
4 / 6
तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल आणि अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा दिवस योग्य ठरेल, भविष्यात चांगला नफा मिळेल. आगामी काळात आत्मविश्वास शिखरावर असेल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील आणि तुमची आर्थिक परिस्थितीही मजबूत होईल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात यश मिळवाल आणि तुम्ही केलेल्या योजनाही यशस्वी होतील. तुमच्या मुलांचा विकास पाहून तुम्हाला आनंद होईल आणि तुम्हाला एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी देखील मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील आणि तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
5 / 6
धनु राशीच्या लोकांमध्ये उत्साह वाढेल आणि त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहील. सामाजिक वर्तुळ विस्तारेल, त्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या वाढेल आणि अनेक खास लोकांशी तुमची ओळखही वाढेल. कौटुंबिक व्यवसायासाठी भावंडांचा सल्ला घ्या, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. नोकरदारांचे सहकारी आणि अधिकारी यांच्याशी चांगले संबंध राहतील आणि त्यांची कामे आनंदाने पूर्ण होतील. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर ते संपतील आणि नाते आणखी घट्ट होईल. घरात नवीन सदस्य येण्याने आनंद होईल.
6 / 6
मकर राशीचे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होतील. मन शांत होईल आणि कामाचा वेग वाढेल. उत्पन्नात आणि संपत्तीत वाढ होईल. करिअरची व्याप्ती वाढवण्यात यश मिळेल आणि नवीन नोकरीच्या चांगल्या संधीही मिळतील. व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील, नवे संबंध प्रस्थापित होऊन नफा होईल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या माणसांबरोबर चांगला वेळ घालवाल. शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थैर्यामुळे वेगाने प्रगती कराल.
टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य