शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रावण गुरुवारी संकष्टी: ८ राशींना पुण्यफल, सरकारी कामात यश; नवीन नोकरी योग, गुंतवणुकीत नफा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 7:07 AM

1 / 12
श्रावण मासातील संकष्टी चतुर्थी गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. गुरुवारी संकष्ट चतुर्थी आल्यामुळे गणपती बाप्पासह श्री स्वामी समर्थ महाराजांचेही शुभाशिर्वाद लाभू शकतात. गुरुवार हा दत्तगुरु, स्वामी तसेच गुरु ग्रहाला समर्पित मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्वामींचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासन करावी. तसेच गुरु ग्रहाशी संबंधित गोष्टी केल्यास ‘गुरुं’ची कृपा लाभू शकेल, असे सांगितले जात आहे.
2 / 12
पंचांगानुसार, गुरुवारी संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग, धृतिमान योग तसेच उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह वक्री चलनाने कर्क राशीत प्रवेश करत आहे. २२ ऑगस्टला वक्री चलनाने कर्क राशीत विराजमान होणारा बुध ग्रह २८ ऑगस्ट रोजी कर्क राशीत मार्गी होणार आहे.
3 / 12
गुरुवार, संकष्ट चतुर्थी तसेच बुधाचे वक्री चलनाने कर्क राशीत होणारे गोचर काही राशींना सकारात्मक अनुकूलता देणारे मानले गेले आहे. नोकरी, करिअर, व्यवसाय, व्यापार, कुटुंब, आर्थिक आघाडी यांमध्ये कोणत्या राशींवर कसा प्रभाव राहू शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
वृषभ: आगामी काळ अनुकूल सिद्ध होऊ शकतो. धैर्य आणि पराक्रम वाढू शकेल. मेहनतीचे यथायोग्य फळ मिळू शकेल. कामाचे कौतुक होऊ शकेल. नोकरी बदलायची असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांना नफा होऊ शकतो. भावंडांचे सहकार्य मिळू शकते. काही मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
5 / 12
मिथुन: नशिबाची साथ प्राप्त होऊ शकेल. मान-सन्मानात वाढेल. मेहनतीच्या जोरावर प्रगती साध्य करण्याची संधी मिळू शकेल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याच्या योजनेबाबत कुटुंबात चर्चा होऊ शकेल.
6 / 12
कर्क: अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या समस्येतून सुटकेचा नि:श्वास सोडू शकाल. शुभवार्ता मिळेल. कर्मचारी पगारवाढीबाबत वरिष्ठांशी बोलू शकतात. नवीन नोकरी शोधू शकतात. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. उपलब्ध पैशातून तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूकही करू शकता. नातेसंबंध अधिक घट्ट होऊ शकतील.
7 / 12
कन्या: चांगला लाभ अन् फायदा होऊ शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरदार बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने अधिकाऱ्यांना प्रभावित करू शकतील. करिअरमध्ये प्रगती होऊ शकेल. तसेच व्यावसायिकांना नफा मिळू शकतो. गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे.
8 / 12
तूळ: शुभ सिद्ध होऊ शकेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार कौशल्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रभावी ठरू शकतील. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वृद्धीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते.
9 / 12
वृश्चिक: परदेश दौऱ्यावर जाण्याची इच्छा पूर्ण करणारी संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात धोरणांमुळे नफा कमावू शकाल. व्यवसायाचा विस्ताराचा विचार पुढे सरकू शकेल. काम करणाऱ्यांना करिअरमध्ये प्रगती दिसेल. कौटुंबिक सदस्यांसोबत संबंध अनुकूल राहतील.
10 / 12
धनु: सकारात्मक परिणाम मिळू शकतील. सुखात वाढ होऊ शकेल. भौतिक सुखसोयींचा लाभ अन् आनंद घेऊ शकाल. अनेक दिवसांपासून प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकेल. कामात वेगळे स्थान प्राप्त करण्याची संधी मिळू शकेल. नवीन घर घ्यायचे असेल किंवा जुन्या घराचे बांधकाम सुरू करायचे असेल तर हा कालावधी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे.
11 / 12
मीन: व्यापारी वर्ग नफा कमवण्याच्या दृष्टीने विचार करतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकतील. व्यावसायिक कल्पना उत्तम प्रकारे साकार करण्याची संधी मिळू शकेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगला ताळमेळ राखू शकाल. सरकारी कामे हळूहळू होऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांचे अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. त्याचा फायदा कामात दिसून येऊ शकेल.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीshree swami samarthश्री स्वामी समर्थAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासSiddhivinayak Ganapati Templeसिद्धिविनायक गणपती मंदिर