शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रविवारी संकष्टी : मोदकांबरोबर बाप्पाला द्या त्याच्या आवडत्या 'या' पाच गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 8:00 AM

1 / 4
या दोन्ही गोष्टी जशा आपल्याला प्रिय आहेत, तशाच बाप्पालाही प्रिय आहेत. मोदक या शब्दातच आनंद दडलेला आहे. मोद म्हणजे आनंद. मोद देणारा तो मोदक. गूळ,खोबरं, तूप यांचे तांदुळाच्या उकडीच्या पारीत भरलेले मिश्रण आणि त्याचा सुबक सुंदर ठेंगणा आकार जणू काही बाप्पाची साजिरी गोजिरी मूर्तीच! अशा मोदकांचा बाप्पाला नैवेद्य दाखवला असता, तो आनंदून जातो. तीच बाब लाडवांची! गोड बातमी मिळाली, की लाडू मागतात. लाडू हे आनंदाचे समीकरणच झाले आहे. अशा दोन्ही गोष्टी बाप्पाच्या आवडीच्या आहेत.
2 / 4
सर्व रोगांना दूर व्हा असा संदेश देणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या दुर्वा आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहेत. अनलसुर नावाच्या असुराला गिळंकृत केल्यानंतर बाप्पाच्या अंगाचा झालेला दाह दुर्वांच्या काढ्यामुळे शांत झाला, तेव्हापासून बाप्पाला दुर्वा आवडू लागल्या.
3 / 4
तुळशी वगळता अन्य कोणतेही फुल बाप्पाला आवडते, असे पद्मपुराणात म्हटले आहे. बाप्पाचा रक्तवर्ण पाहता त्याला जास्वंदाचे फुल अधिक प्रिय असावे असे म्हटले जाते व त्याच फुलांची माळा अर्पण केली जाते.
4 / 4
हनुमंताप्रमाणे बाप्पालाही शेंदूर प्रिय आहे असे शिवपुराणात म्हटले आहे. असे म्हणतात, की भगवान शंकरांनी बाप्पाचे शीर धडापासून वेगळे केले आणि त्यावर गजाचे शीर जोडले त्यावेळेस शेंदूर लेपन केले होते. या उदाहरणाचा दाखला आजही देत बाप्पाला शेंदूर लेपन केले जाते.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती