शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्वपित्री अमावास्या: ४ ग्रहांचा शुभ संयोग; ‘या’ ५ राशींना पितरांची कृपा, भरभराट, यशाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 3:46 PM

1 / 15
चातुर्मासात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामधील पंधरा दिवसांचा कालावधी पितरांचे स्मरण करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या कालावधीत कुटुंबात निधन झालेल्या व्यक्तींचे स्मरण करून त्यांना पुढची गती लाभण्यासाठी तर्पण, श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षातील सर्वाधिक महत्त्वाची तिथी म्हणजे सर्वपित्री अमावास्या. यंदाच्या वर्षी २५ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. (sarvapitri amavasya 2022 astrology)
2 / 15
ज्यांना तिथीनुसार श्राद्ध विधी करणे शक्य नसेल, तर सर्वपित्री अमावास्येला ते केले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीला पूर्वजांची तिथी माहिती नसेल, तरीही सर्वपित्री अमावास्येला ते श्राद्ध विधी करू शकतात, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्वपित्री अमावास्येला एक दोन नाही, तर चार ग्रहांचा शुभ योग जुळून येत आहे.
3 / 15
सर्वपित्री अमावास्येला नवग्रहांचा राजा सूर्य, नवग्रहांचा राजकुमार बुध, शुक्र आणि चंद्र या चार ग्रहांचा शुभ योग कन्या राशीत जुळून येत आहे. हे चारही ग्रह सर्वपित्री अमावास्येला कन्या राशीत विराजमान असतील. याचा दुहेरी फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 15
कन्या राशीत सूर्य आणि बुध या दोन ग्रहांच्या युतीने तयार होणारा बुधादित्य योग जुळून येत आहे. तसेच सूर्य, बुध आणि शुक्र या ग्रहांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. यालाच लक्ष्मी नारायण योग असेही म्हटले जाते. याशिवाय आणखी एक विशेष म्हणजे या दिवशी चंद्र आणि सूर्य हेदेखील एकाच राशीत आहेत.
5 / 15
एकीकडे सर्वपित्री अमावास्येला पितरांची कृपा होऊ शकते. तसेच हीच ग्रहस्थिती अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापनेला नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीही कायम असल्यामुळे दुर्गा देवीचे शुभाशिर्वादही प्राप्त होऊ शकतात. सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवाचा शुभ लाभ काही राशींना प्राप्त होऊ शकतो. जाणून घेऊया...
6 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवारंभाचा ४ ग्रहांचा शुभ योग लाभदायक ठरू शकतो. शत्रूंवर, विरोधकांवर विजय मिळवू शकाल. करिअरमध्ये आणि व्यवसायात जी काही आव्हाने येत असतील, ती तुम्ही पार करून यशाची शिखरे गाठाल. नव्या नोकरीची चांगली ऑफर मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळू शकते, मेहनत सुरूच ठेवा. संयम आणि व्यावहारिकतेने काम करावे लागेल. तसेच नवदुर्गा कृपेमुळे विवाहेच्छुकांना चांगले स्थळ मिळू शकते.
7 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवारंभाचा ४ ग्रहांचा शुभ योग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला सामाजिक स्तरावर प्रसिद्धी मिळेल. प्रेम जीवनात सामंजस्य दिसून येईल. संततीकडून आनंद मिळू शकेल. आपल्या मुलांच्या लग्नासाठी प्रयत्न करत असाल, तर यश मिळेल. कलाविश्वाशी निगडित असलेल्यांना त्यांच्या कलेचा लाभ आणि सन्मान मिळेल. जे फॅशन, आर्ट, ज्वेलरी, कपडे यांचा व्यवसाय करतात, त्यांची कमाई वाढेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवारंभाचा ४ ग्रहांचा शुभ योग उत्तम फलदायी ठरू शकेल. पालकांच्या पाठिंब्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीतही वाढ होईल. वाहन खरेदी, घर खरेदीत यश मिळू शकेल. तुमचा प्रभाव समोरच्या व्यक्तींवर राहील. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. शेजाऱ्यांशी सामंजस्याने राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
9 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवारंभाचा ४ ग्रहांचा शुभ योग लाभदायक ठरू शकेल. तुमचा करिअरचा आलेख अचानक उंची गाठू शकतो. नोकरीच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. तुमच्या जीवनात शांतता आणि स्थिरता येईल. कुटुंबात तुमचा प्रभाव वाढेल. आर्थिक आघाडीची चिंता दूर होऊ शकेल. ही ग्रहस्थिती तुमच्या अध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त ठरू शकेल. नवीन अनुभव आणि ज्ञान प्राप्ती होऊ शकते.
10 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवारंभाचा ४ ग्रहांचा शुभ योग अतिशय शुभ ठरू शकेल. या काळात वैवाहिक जीवनात चांगले बदल दिसून येऊ शकतात. प्रेम जीवनात सकारात्मकता दिसून येऊ शकेल. तुम्ही तुमचे नाते पुढील स्तरावर नेऊ शकता. प्रसारमाध्यमे, राजकारण या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही काही प्रमाणात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आगामी काळात फायदा होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभण्यासाठी योग, ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला जात आहे. भौतिक सुख उपभोगू शकाल.
11 / 15
मात्र, काही राशीच्या लोकांना या कालावधीत संयमाने गोष्टी हाताळणे गरजेचे असून, हा काळ संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी आर्थिक आघाडीवरील निर्णय घेताना दोनदा विचार करावा. तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊनच अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणे उपयुक्त ठरू शकेल. मेहनतीचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळेलच असे नाही. हितशत्रूंपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
12 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवारंभाचा ४ ग्रहांचा योग संमिश्र ठरू शकतो. आपले बजेट पाहून खर्चाचे नियोजन करावे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. काही करणास्तव मानसिक चिंता सतावू शकते. डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
13 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवारंभाचा ४ ग्रहांचा योग संमिश्र ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामातील उणिवा शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही सर्व काही एकाग्रतेने केल्यास चांगले होईल. भावंडांसोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. मन संतुलित ठेवण्यासाठी योगासने आणि ध्यान करणे आवश्यक आहे, तुम्हाला दुर्गा उपासना आणि सप्तशती पठणाचा खूप फायदा होऊ शकेल.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रोत्सवारंभाचा ४ ग्रहांचा योग संमिश्र ठरू शकतो. नोकरदारांची अचानक बदली होऊ शकते. काही समस्या येऊ शकतात. व्यवसायिक पातळीवरील नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला नियमित कवच, कीलक अर्गल स्तोत्राचे पठण करणे उचित आहे.
15 / 15
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, सर्वपित्री अमावास्येला जुळून येत असलेला चार ग्रहांचा योग आणि नवरात्रोत्सव या विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्षNavratriनवरात्रीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य