शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनीचा मकर राशीत अस्त: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ; कोणी काय काळजी घ्यावी? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 8:54 AM

1 / 15
सन २०२२ हे वर्ष शनीच्या राशीचक्रातील संचारासाठीचे महत्त्वाचे वर्ष मानले जात आहे. शनीचे चलन सर्व राशींवर प्रभाव पाडणारे ठरणारे आहे. यातच शनीचेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत सूर्य विराजमान झाला आहे. शनी आणि सूर्य हे पिता-पुत्र असले तरी ते एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. (saturn combust 2022)
2 / 15
शनी आणि सूर्य शत्रू ग्रह एकाच राशीत असल्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच १९ जानेवारी रोजी मकर राशीत अस्त होणार असून, २१ फेब्रुवारी रोजी उदय होणार आहे. शनी हा नवग्रहातील न्यायाधीश ग्रह मानला जातो. (shani ast january 2022)
3 / 15
शनी अस्त होणे ही एक खगोलीय घटना असली, तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. शनीचा अस्त होणे म्हणजे शनी सूर्य ग्रहाच्या अतिशय जवळून मार्गक्रमण करतो. या शनी अस्ताचा प्रभाव सर्व राशींवर होणार असला, तरी केवळ ४ राशीच्या व्यक्तींना हे शुभ लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया...
4 / 15
शनीचा अस्त मेष राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. या कालावधीत काही मानसिक तणाव निर्माण होऊ शकतात. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. करिअरमध्ये काळ फारसा अनुकूल नाही. मेहनत करूनही अपेक्षित परिणाम साध्य होईलच असे नाही. या कालावधीत हनुमान चालीसा पठण करणे उपयुक्त ठरू शकते.
5 / 15
शनीचा अस्त वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरू शकेल. परदेशगमनाची इच्छा पूर्ण होऊ शकते. शुभ योग जुळून येऊ शकतात. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. नव्या नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली असू शकेल. सुख, समृद्धी नांदू शकेल. नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. शक्य असेल, तर शनिवारी वस्त्रांचे दान करणे लाभदायक ठरू शकते.
6 / 15
शनीचा अस्त मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरू शकेल. या कालावधीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. एखाद्या महत्त्वाच्या कामाचा प्रारंभ न करण्याचा सल्ला दिला जात आहे. जमीन, मालमत्ता खरेदीचा विचार पुढे ढकलावा. नोकरीत कामाचे समाधान मिळणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी. शक्य असेल, तर नियमितपणे श्रीकृष्णाचे पूजन करावे.
7 / 15
शनीचा अस्त कर्क राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा प्रतिकूल ठरू शकतो. नोकरीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाचे समाधान मिळणार नाही. कार्यक्षेत्रात एखाद्या गोष्टीचा दबाव असू शकतो. व्यवसायात मंदी राहू शकते. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. या कालावधीत महादेव शिवशंकराचे पूजन उपयुक्त ठरू शकेल.
8 / 15
शनीचा अस्त सिंह राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम ठरू शकेल. आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. नोकरदार वर्गाला यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. नवीन नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. व्यवसायात नफा कमावणे शक्य होऊ शकेल. आर्थिक आघाडी चांगली राहील. धनप्राप्तीचे योग जुळून येऊ शकतील. शनिवार आणि सोमवारी शिवाची पूजा करणे लाभदायक ठरू शकेल.
9 / 15
शनीचा अस्त कन्या राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा आव्हानात्मक ठरू शकेल. आर्थिक आघाडीकडे लक्ष केंद्रीत करणे उपयुक्त ठरेल. अनावश्यक खर्च टाळावेत. मानसिक तणाव वाढू शकतो. जोडीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास अन्नदान करावे.
10 / 15
शनीचा अस्त तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र ठरू शकतो. सुख-सुविधांमध्ये कमतरता येऊ शकते. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. नोकरीतील कामात समाधान मिळणार नाही. कार्यालयातील सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही. काही गोष्टींसाठी अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. दररोज हनुमान चालीसा पठण करणे उपयुक्त करू शकते.
11 / 15
शनीचा अस्त वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी प्रतिकूल ठरू शकतो. विकासाची गती धीमी होऊ शकते. करिअरमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. अनपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकते. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग उद्भवू शकतात. शक्य असेल शनिवारी शनी स्तोत्राचे पठण करणे उपयुक्त ठरू शकते.
12 / 15
शनीचा अस्त धनु राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र ठरू शकतो. आत्मविश्वास कमजोर होऊ शकतो. मान-सन्मान कमी होऊ शकतो. सामान्यपणे दिवस जाऊ शकतील. आर्थिक आघाडीवर लक्ष केंद्रीत करणे उपयुक्त ठरू शकेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. गुरुवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला जात आहे.
13 / 15
शनीचा अस्त मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुभ लाभदायक ठरू शकेल. कार्यालयात वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकेल. पदोन्नतीची शुभ वार्ता मिळू शकेल. व्यवसाय, उद्योगासाठी उत्तम अनुकूल काळ. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवसायात फायदा मिळू शकेल. जुनी येणी वसूल होऊ शकतील. शक्य असेल तर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावणे लाभदायक ठरू शकेल.
14 / 15
शनीचा अस्त कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा समस्याकारक ठरू शकतो. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक आघाडीवर लक्ष केंद्रीत करणे उपयुक्त ठरू शकते. कार्यालयात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. या कालावधीत अधिक मेहनत घ्यावी लागेल. शक्य असल्यास दररोज ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करणे उपयुक्त ठरू शकेल.
15 / 15
शनीचा अस्त मीन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. धन आणि लाभात वृद्धी होऊ शकेल. केलेल्या कष्टाचे चीज होऊ शकेल. व्यापारात फायदा होऊ शकेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होऊ शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी. शक्य असेल तर शनिवारी दुर्गा देवीचे पूजन करणे उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य