शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी अस्तंगत: ३ राशींवर विशेष कृपा, धनलाभ योग; ३ राशींना संमिश्र काळ, अखंड सावध राहावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:14 PM

1 / 10
नवग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीत विराजमान झाला आहे. तत्पूर्वी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी अस्तंगत झाला आहे. शनी अस्तंगत होणे महत्त्वाचे मानले जाते. शनी कर्मप्रधान ग्रह असून, एखाद्या व्यक्तीच्या कर्मानुसार फल देतो, अशी मान्यता आहे. आताच्या घडीला सूर्य आणि शनी एकाच कुंभ राशीत विराजमान आहेत.
2 / 10
कुंभ राशीत सूर्य आणि शनी एकमेकांपासून अगदी जवळच्या अंशांवर असतील. सूर्याच्या प्रभावामुळे शनी पृथ्वीवरून दिसणार नाही. यालाच शनी अस्त असे म्हटले जाते. कालांतराने सूर्य आणि शनी एकमेकांपासून लांबच्या अंतरावर गेल्यामुळे शनीदर्शन होऊ शकेल, या अवस्थेला शनी उदय झाला असे म्हटले जाते.
3 / 10
काही मान्यतांनुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र असले, तरी एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. मात्र, असे असले तरी शनीची अस्तंगत अवस्था काही राशींसाठी उत्तम मानली जात आहे. तर काही राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
4 / 10
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा अस्त काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामात विविध प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदारांचे वरिष्ठांशी वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांमध्येही मतभेद होऊ शकतात.
5 / 10
वृषभ राशीच्या व्यक्तींना शनीचा अस्त काहीसा संमिश्र ठरू शकेल. आयुष्यात काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. करिअरमध्ये काही अडथळे येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत सावधपणे पुढे जावे लागेल. वैवाहिक जीवनात संतुलन राखावे लागेल.
6 / 10
मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचा अस्त विशेष कृपा असणारा ठरू शकेल. भाग्याची साथ मिळेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळविण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळाल्याने मान-सन्मान मिळू शकतो. धनवृद्धी होऊ शकेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळू शकेल.
7 / 10
कर्क राशीच्या व्यक्तींना शनीचा अस्त लाभदायक ठरू शकेल. नोकरीत अडचणी येत असतील, तर आगामी काळ दिलासादायक ठरू शकेल. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. कामात प्रगती होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. व्यवसायात चांगल्या नफ्यामुळे आर्थिक स्थिती सतत सुधारेल. समाजात मान-सन्मान वाढेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल.
8 / 10
सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचा अस्त यशकारक ठरू शकतो. करिअरमध्ये नवी उंची गाठण्याची संधी मिळू शकेल. कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री करून चांगला नफा मिळवू शकता. कामाच्या बाबतीत समाधान मिळेल.
9 / 10
कन्या राशीच्या व्यक्तींना शनीचा अस्त काहीसा संमिश्र ठरू शकतो. त्रास वाढू शकतो. नोकरदारांना थोडे सावध राहावे लागेल. अत्यंत सावधगिरीने काम करावे लागेल. व्यवसायात नुकसान झाल्यामुळे मन उदास राहू शकते. धीर धरावा. आजूबाजूचे वातावरण चांगले राहणार नाही.
10 / 10
शनी कुंभ राशीत विराजमान असून, मकर रास, कुंभ रास आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य