शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनीदेव मार्गी: ‘या’ राशींची स्थिती ‘जैसे थे’ राहणार; कोण साडेसाती मुक्त होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 2:29 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह नियमित कालावधीत ब्रह्मांडात भ्रमण करत असतात. ज्योतिषशास्त्रात न्याय आणि कर्माचा देव मानला जाणाऱ्या शनीने १२ जुलै रोजी वक्री चलनाने आपलेच स्वामीत्व असलेल्या मकर राशीत प्रवेश केला होता. यानंतर आता याच राशीत काही दिवसांनी शनी मार्गी होणार आहे. (shani direct in capricorn 2022)
2 / 9
२३ ऑक्टोबर रोजी शनी मकर राशीत मार्गी होणार असून, यानंतर जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. १२ जुलैपूर्वी शनी कुंभ राशीत असताना, मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींवर साडेसातीचा प्रभाव होता. मात्र, शनीने मकर प्रवेश केल्याने यात बदल झाला. (shani margi in makar rashi 2022)
3 / 9
शनीने वक्री मार्गाने मकर राशीत प्रवेश केल्यावर धनु राशीच्या व्यक्तींवर पुन्हा एकदा साडेसातीचा प्रभाव सुरू झाला. आणि मीन राशीवरील साडेसातीचा प्रभाव अत्यल्प झाला. तर, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनीची ढिय्या सुरू झाली. (shani sade sati effect after shani margi in makar 2022)
4 / 9
शनी हा क्रूर ग्रह असला तरी कर्मकारक आहे. जसे ज्याचे कर्म, तशी फळे त्या त्या व्यक्तीला मिळतात, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, शनीची दृष्टी शुभ असेल तर व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळते. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी शनी मकर राशीत मार्गी होईल, तेव्हा साडेसाती चक्रात कोणताही बदल होणार नाही.
5 / 9
याचाच अर्थ आताच्या घडीला धनु, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा प्रभाव दिसून येऊ शकेल. धनु राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा, मकर राशीचा मधला टप्पा आणि कुंभ राशीचा पहिला टप्पा सुरू आहे. मात्र, जेव्हा जानेवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत जाईल, तेव्हा साडेसातीत पुन्हा एकदा बदल होईल.
6 / 9
शनीने आपलेच स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर धनु राशीची साडेसाती संपेल. मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. कुंभ राशीचा मधला टप्पा सुरू होईल, तर मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. धनु राशीनंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येण्यासाठी २०२५ वर्ष उजाडेल.
7 / 9
साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. तसेच शनीची उपासना, स्तोत्र पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
8 / 9
दुसरीकडे, शनीच्या मार्गी चलनामुळे साडेसातीप्रमाणे जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत पुन्हा मिथुन आणि तूळ राशीवर ढिय्या प्रभाव राहील. तो जानेवारी २०२३ नंतर पूर्णपणे संपुष्टात येईल. यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीवर ढिय्या प्रभाव असेल. जानेवारी २०२३ मध्ये तो पूर्णपणे लागू होईल.
9 / 9
२९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य