शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२३ ऑक्टोबरला शनीचे चलनबदल: ‘या’ ५ राशींना वरदान काळ; धनलाभाचे शुभ योग, अपार यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 1:52 PM

1 / 9
ऑक्टोबर महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात ५ ग्रहांचे स्थानबदल, चलनबदल होणार आहेत. काही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणार असून, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनीदेव आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणार आहे. (saturn direct in capricorn from 23 october 2022)
2 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला बुध ग्रह ०२ ऑक्टोबर रोजी कन्या राशीत मार्गी होईल. तसेच २६ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ १६ ऑक्टोबर रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. (shani margi in makar in diwali 2022)
3 / 9
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला सूर्य १७ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. शुक्र कन्या राशीतून १८ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर २३ ऑक्टोबर रोजी शनीदेव मकर राशीत मार्गी होतील. गेले काही महिने शनी वक्री चलनाने मकर राशीत विराजमान आहे.
4 / 9
विशेष म्हणजे २३ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. त्यामुळे शनीचे मार्गी होणारे काही राशींना अतिशय शुभ मानले गेले असून, ऐन दिवाळीत काही राशींना हा काळ अपार यश, धनलाभाचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. त्या लकी राशी कोणत्या? जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे मार्गी होणे खूप खास मानले जाते. शनीच्या शुभ प्रभावामुळे धनत्रयोदशीला धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होऊ शकेल. धातूचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगल्या कमाईचा ठरू शकतो. जे लोक इलेक्ट्रिकल उपकरणे आणि वाहनांच्या व्यवसायात आहेत त्यांच्यासाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. कपड्यांच्या व्यवसायातही फायदा होऊ शकेल.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींवर शनीचा ढिय्या प्रभाव असला, तरी शनीचे मार्गी होणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला पैशाच्या बाबतीत फायदा होईल. तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होऊ शकतील. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. मात्र, दिवाळी असल्याने तुमच्या हातून होणारा खर्चही जास्त असेल. तुम्हाला करिअरच्या दृष्टीने सुवर्ण संधी मिळू शकतात. चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना शनी मार्गी होणे लाभदायक ठरू शकेल. दिवाळीच्या कालावधीत विशेष लाभ होऊ शकतो. उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते. तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. मुलांच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले झाल्याने कौटुंबिक वातावरण आनंद द्विगुणित करणारे ठरू शकेल.
8 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी मार्गी होणे भाग्यकारक ठरू शकेल. या काळात वाहन सुख मिळू शकते. त्याचबरोबर जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकेल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला आनंद मिळेल. भावंडांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. या काळात प्रवासही फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु योजना यशस्वी झाल्यास मेहनतीचे फायदे मिळतील.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना शनी मार्गी होणे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकता. ज्या लोकांना व्यवसायात आतापर्यंत नुकसान होत होते, अशा लोकांसाठी शनीच्या शुभ प्रभावाने चांगला काळ सुरू होणार आहे. तुम्हाला तणावातून आराम मिळेल आणि घरातील समस्याही संपतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यDiwaliदिवाळी 2021