शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मकरेत शनी-मंगळ युती: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना काहीसा अडचणीचा काळ; राहावे सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 10:18 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या गोचरावरून त्याचे सर्व राशींवर होणारे परिणाम यांचा अभ्यास करून भविष्यातील काही गोष्टींबाबतचे तर्क, अंदाज लावले जातात. फेब्रुवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. (saturn mars conjunction in capricorn 2022)
2 / 9
नवग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. २६ फेब्रुवारीला मंगळ राशीबदल करणार आहे. मंगळाला क्रूर ग्रहही मानले जाते. (shani mangal yuti in makar rashi 2022)
3 / 9
मंगळाच्या या मकर राशीतील गोचरामुळे शनी आणि मंगळाची युती होत असल्याचे सांगितले जात आहे. शनी आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत विराजमान आहे. शनी आणि मंगळ युतीचे परिणाम केवळ राशींवर नाही, देशासह जगावरही पाहायला मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
4 / 9
शनी मंगळ युतीचा मिथुन राशीच्या व्यक्तींवर संमिश्र परिणाम दिसून येऊ शकेल. या कालावधीत कोणताही बडा आर्थिक व्यवहार काळजीपूर्व करावा, असा सल्ला दिला जात आहे. याशिवाय खर्चावर नियंत्रण ठेवावे. ताळेबंध अचूक ठेवावा. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ल्याशिवाय निर्णय घेऊ नये. कार्यक्षेत्रात कोणताही नवा प्रयोग करू नये. योगाभ्यास, ध्यानधारणा केल्यास मानसिक तणाव काहीसा दूर होऊ शकतो.
5 / 9
शनी मंगळ युती काळात कर्क राशीच्या व्यक्तींनी सावध राहावे, असे सांगितले जात आहे. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. भागीदारीच्या कामात सावधगिरी बाळगून पावले उचलावीत. या कालावधीत कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा. तुमचे वरिष्ठ आणि अधीनस्थ तुमच्यावर फारसे खूश नसण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही नवीन स्टार्टअप किंवा नवीन प्रकल्प सुरू करू नका.
6 / 9
शनी मंगळ युतीमुळे सिंह राशीच्या व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. या काळात तुम्ही एखाद्या कायदेशीर अडचणीत अडकू शकता आणि तुमच्या आयुष्यात आधीच कोणताही कायदेशीर वाद सुरू असेल तर परिस्थिती थोडी प्रतिकूल दिशेने जाऊ शकते. हितशत्रूंकडून सावध राहावे.
7 / 9
शनी मंगळ युतीचा कालावधी कन्या राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रात अडचणी, समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुलांशी असलेले नातेसंबंध तणावाचे होऊ शकतात. तुमची बढती आणि पगारवाढीला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी जाणवेल.
8 / 9
शनी मंगळ युती धनु राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. वाणीवर संयम ठेवावा. भावंडांची साथ मिळणार नाही. या काळात तुमचे विरोधक आणि प्रतिस्पर्धी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील आणि तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात. या वेळी तुम्ही व्यवसायात नवीन करार करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तो आत्ताच पुढे ढकला कारण आताचा काळ अनुकूल नाही.
9 / 9
शनी मंगळ युतीचा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी तणावाचा ठरू शकतो. या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवावे. नकारात्मक विचार काहीसे वाढू शकतात. यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. कोणत्याही वादात पडू नये. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्यावे. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा. वायफळ खर्च करू नये.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य