शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सन २०२२ मध्ये ‘या’ ४ राशींवर असेल शनीचा ढिय्या प्रभाव; कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 9:01 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, सन २०२२ अनेकार्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, नवग्रहातील न्यायाधीश मानला जाणारा शनी ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
2 / 9
२९ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या शनीच्या राशीपरिवर्तनामुळे मोठे बदल होतील, असे सांगितले जात आहे. धनु राशीची साडेसाती संपून मीन राशीची साडेसाती सुरू होईल. मकर राशीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीचा मधला टप्पा आणि मीन राशीचा पहिला टप्पा, असे चक्र सुरू होईल.
3 / 9
साडेसाती व्यतिरिक्त शनीचा प्रभाव अन्य ४ राशींवर राहील, असे सांगितले जात आहे. काही राशींवरील शनीचा ढिय्या प्रभाव संपुष्टात येईल. तर काही राशींवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होईल. कोणत्या राशींवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होईल? जाणून घ्या...
4 / 9
सन २०२२ मध्ये शनीचा ढिय्या प्रभाव बुधचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीवर असेल, असे सांगितले जात आहे. २९ एप्रिल रोजीपासून हा प्रभाव सुरू होईल. या कालावधीत या राशीच्या व्यक्तींना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. धोका पत्करून गुंतवणूक करू नका. एप्रिल ते जुलै हा कालावधी काहीसा चांगला राहील. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. चिंता दूर होऊ शकतील.
5 / 9
सन २०२२ मध्ये शनीचा ढिय्या प्रभाव चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीवर असेल, असे सांगितले जात आहे. कौटुंबिक जीवनात तारतम्याने वागावे लागेल. अचानक काही अडचणींचा सामना करू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. १२ जुलैनंतर काही प्रमाणात परिस्थिती सुधारेल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील.
6 / 9
सन २०२२ मध्ये शनीचा ढिय्या प्रभाव शुक्रचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीवर असेल, असे म्हटले जात आहे. मानसिक आणि भावनिक दृष्ट्या काहीसा कठीण ठरू शकेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार आणि ज्येष्ठ-तज्ज्ञांचे अवश्य मार्गदर्शन घ्यावे. १२ जुलैनंतर काहीसा दिलासादायक काळ राहील. गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळू शकतील. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकेल.
7 / 9
सन २०२२ मध्ये शनीचा ढिय्या प्रभाव मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीवर असेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत आपल्या योजनांमध्ये अडथळा येऊ शकेल. विरोधकांच्या हालचाली वाढू शकतील. यश मिळण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. जोखीम पत्करून कामे करू नयेत. १२ जुलैनंतर सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील.
8 / 9
अन्य राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीतील स्थानी शनी ग्रह कोणत्या स्थानी आहे, त्यानुसार त्या व्यक्तीला फळे प्राप्त होत असतात, असे सांगितले जाते. शनी हा न्यायाचा कारक असून, जसे आपले कर्म असेल, तसा परतावा मिळतो, असे सांगितले जाते.
9 / 9
शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनीची उपासना, मंत्र, श्लोक, स्तोत्र अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, असे सांगितले जाते. तसेच शनिवारी शनी देवाचे दर्शन घेणे, मारुतीच्या देवळात जाणे, लाभदायक ठरते, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य