शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी वक्री होणे शुभ की अशुभ? साडेसातीचे चक्र बदलणार; ‘या’ राशींना लाभच लाभ, सर्वोत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 10:35 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह नियमित कालावधीत ब्रह्मांडात भ्रमण करत असतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ब्रह्मांडातील क्रांती मार्गावर असलेले नक्षत्र, तारका समूहापासून तयार होणाऱ्या राशी यातून हे सर्व मार्गक्रमण होत असते. (saturn retrograde in capricorn 2022)
2 / 15
नवग्रहातील केवळ सूर्य आणि चंद्र हे दोनच ग्रह असे आहेत, ते कधीच वक्री होत नाहीत. तर राहु आणि केतु असे दोन छाया ग्रह आहेत, जे नेहमीच वक्री चलनानेच मार्गक्रमण करतात. कधीच मार्गी होत नाहीत. मात्र, नवग्रहातील उर्वरित ग्रह वक्री आणि मार्गी दोन्ही प्रकाराने मार्गक्रमण करतात. (shani vakri in makar rashi 2022)
3 / 15
ज्योतिषशास्त्रात न्याय आणि कर्माचा देव मानला जाणारा शनी १२ जुलै रोजी वक्री चलनाने स्वराशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीचे वक्री चलन शुभ आणि प्रतिकूल असे दोन्ही प्रभाव देणारे ठरू शकते. (saturn retrograde auspicious or inauspicious)
4 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींची साडेसाती सुरू आहे. मात्र, शनीने वक्री मार्गाने मकर राशीत प्रवेश केला की, आगामी काही काळासाठी धनु राशीवर साडेसातीचा प्रभाव दिसून येऊ शकेल. (shani vakri shubh ki ashubh)
5 / 15
जेव्हा शनिदेव शुभ स्थानी असतात, तेव्हा व्यक्तीचे भाग्य, नशीब उजळून निघते आणि शनिदेवाच्या प्रतिकूल स्थितीचा नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे वक्री आणि मार्गी चलन खूप महत्वाचे मानले जाते. वक्री शनीबद्दल लोकांच्या मनात अनेक भिन्न धारणा आहेत, काही शुभ तर काही अशुभ.
6 / 15
एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत प्रत्येक ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या दिशेने फिरतो. परंतु कधीकधी त्यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्याचे दिसते, ज्याला ग्रहाची वक्री अवस्था म्हणतात. जेव्हा कोणताही ग्रह सामान्यपणे विरुद्ध दिशेने फिरू लागतो, तेव्हा त्याला ज्योतिषाच्या भाषेत वक्री चलन असे म्हटले जाते.
7 / 15
वक्री शनी ज्या नक्षत्रात स्थित आहे, ते त्या नक्षत्राच्या स्वामीनुसार फळ देतात, अशी मान्यता आहे. मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनि हे पाच ग्रह वेळोवेळी वक्री होतात. शनिदेव हा क्रूर ग्रह नाही, शनिदेव न्यायाधीश आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती लोभ आणि आसक्तीने प्रभावित होते, अन्याय आणि अत्याचार करतात, पाप करतात आणि व्यभिचाराचा अवलंब करतात, तेव्हा शनिदेव अशा लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा देतात, असे म्हणतात.
8 / 15
मकर राशीत शनिदेवाच्या वक्री चलनामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळू शकतील. सर्व नऊ ग्रहांमध्ये शनी ग्रह न्यायाधीश आणि कर्म दाता मानले जातात. शनीच्या हालचालीतील बदलाचा सर्व राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडू शकतो.
9 / 15
दुसरीकडे, काही राशीच्या लोकांवर शनीच्या वक्री चलनाचा शुभ प्रभाव दिसू शकतो. नोकरीत बढती किंवा नवीन नोकरीचे दरवाजे उघडू शकतात. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचे प्रेम मिळू शकते, तुम्हाला प्रवास लाभदायक ठरू शकतात.
10 / 15
वक्री म्हणजे विरुद्ध दिशेने जाणे. जेव्हा शनी वक्री असतात तेव्हा त्यांच्या दृष्टीचा प्रभाव वेगळा असतो. वक्री ग्रह त्याच्या उच्च राशीत असल्यासारखे परिणाम देतात, अशी मान्यता आहे.
11 / 15
जेव्हा एखादा वक्री ग्रह संयुक्त ग्रहाशी जोडला जातो, तेव्हा त्याच्या प्रभावात मध्यम वाढ होते. ते त्यांची फळे हळूहळू देतात आणि वक्री ग्रहासोबत भ्रमण करतात, असे सांगितले जाते.
12 / 15
शनीचे वक्री चलन प्रतिकूल मानले जाते. कारण, जर शनी शुभ स्थितीत नसेल, तर तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात, तुमचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होईलच असे नाही. तुम्हाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागू शकेल.
13 / 15
जेव्हा शनी वक्री होतो, तेव्हा अधिक शक्तिशाली होतो आणि त्याचा प्रभाव राशींवर खूप वाढतो, असे म्हटले जाते. ज्या राशीच्या राशींवर त्याचा परिणाम होतो, त्यांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
14 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह आणि नक्षत्रांमध्ये शनी हा सर्वांत संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनिदेवाचे वास्तव्य एका राशीत अडीच वर्षे असते. त्यानंतरच ते दुसऱ्या राशीत गोचर करतात. १२ जुलैपासून धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील.
15 / 15
शनी हा कर्माचा देव आहे आणि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार वेदना किंवा शिक्षा देतात. शनी मकर राशीत वक्री असतो, तेव्हा कर्क आणि वृश्चिक यासह अन्य काही राशीच्या व्यक्तींना नक्कीच फायदा होऊ शकेल. संपत्ती आणि भाग्यात वाढ होऊ शकते. व्यवसायात चांगला काळ येऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, शनी वक्रीचा तुमच्यावर होणाऱ्या प्रभावासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य