शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना खडतर, प्रतिकूल; सतर्क राहण्याचा संमिश्र काळ! तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 1:32 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह नियोजित, नियमित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. वक्री, मार्गी, अस्तंगत तसेच उदय होत असतात. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत वक्री होणार आहे. आताच्या घडीला शनी कुंभ राशीत आहे.
2 / 9
मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचे स्वामित्व शनीकडे आहे. सन २०२५ पर्यंत शनी याच राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. मात्र, काही दिवसांनी शनी वक्री होणार असून, सुमारे ४ महिने शनी वक्री अवस्थेत असणार आहे.
3 / 9
आताच्या घडीला मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तर कुंभ राशीचा साडेसातीचा मधला किंवा दुसरा टप्पा सुरू आहे. याशिवाय मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मकर राशीची साडेसाती संपेल, असे सांगितले जात आहे.
4 / 9
शनी १७ जून रोजी याच राशीत वक्री होणार आहे. तर ४ नोव्हेंबर रोजी शनी याच राशीत पुन्हा मार्गी होणार आहे. . शनी हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो. शनीचे वक्री होणे काही राशींसाठी समस्याकारक, अडचणी वाढवणारे तसेच संमिश्र काळ ठरणार आहे. कोणत्या ५ राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल. अचानक काही आरोग्य समस्यांनाही सामोरे जावे लागू शकेल. कामाचा भार जास्त असल्याने मानसिक ताण वाढू शकेल. व्यावसायिकांसाठी अनुकूल काळ राहू शकेल. आव्हाने कमी होतील. धनलाभ वाढू शकेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. मोठी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ नाही. नवीन काम सुरू करण्याचा विचार टाळावा. सुरू असलेल्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम करावे लागतील. मात्र कालांतराने सर्व काही सामान्य होऊ शकेल.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींमध्ये गैरसमज वाढू शकतात. आर्थिक बाबतीत हा काळ खूप आव्हानात्मक असू शकेल. आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येऊ शकतात. शक्य असेल तर शनिवारी रुद्राभिषेक करावा.
8 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे काहीसे संमिश्र ठरू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. धावपळ वाढू शकेल. मालमत्तेवरून वाद होऊ शकतात. मात्र, कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असू शकेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबा. शक्य असल्यास दर शनिवारी बजरंगबलीची पूजा करून मंदिरात जावे.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. याच राशीत शनी वक्री होत आहे. कुंभ राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. आर्थिक आघाडीवर सावधगिरी बाळगून व्यवहार करावे. अपेक्षेप्रमाणे यश मिळेलच असे नाही. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. मात्र, नोकरी आणि व्यापारात उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतील. यश, प्रगतीची संधी मिळू शकेल. नवीन कामात जोडीदाराचे सहकार्य मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य