शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shani Sade Sati 2022: सन २०२२ मध्ये ‘या’ व्यक्तींवर असेल साडेसातीचा प्रभाव; शनी राशीपरिवर्तनाने काय बदल होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 7:46 AM

1 / 12
हिंदू धर्मात ज्योतिष, पंचांग, राशी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. दररोज सकाळी उठून आपले सर्वप्रथम आपले भविष्य पाहणारे कोट्यवधी लोकं आहेत. ज्योतिष आणि भविष्यावर अगाध श्रद्धा असणारी माणसे योग, ग्रह, साडेसाती यांची माहिती वारंवार घेत असतात.
2 / 12
शनी हा ग्रह न्यायदान करणार, कर्मकारक ग्रह आहे. शनीच्या कृपाकटाक्षाने अनेकांचा किंबहुना प्रत्येकाचा भाग्योदय होत असतो. त्याचे प्रधान कारण शनी व गुरु या ग्रहांच्या सहकार्याशिवाय कोणतेही कर्म करणे शक्य होत नाही, असे सांगितले जाते.
3 / 12
आताच्या घडीला धनु, मकर आणि कुंभ या तीन राशीचा साडेसाती काळ सुरू आहे. मात्र, २९ एप्रिल २०२२ नंतर यामध्ये बदल होईल. कारण शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे धनु राशीचा साडेसातीचा काळ संपुष्टात येईल. तर, मीन राशीची साडेसाती सुरू होईल. (Shani Sade Sati 2022)
4 / 12
दुसरीकडे, मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल आणि कुंभ राशीचा मधला टप्पा सुरू होणार आहे. मात्र, ही स्थिती तीन महिन्यांपर्यंत असेल. याचे कारण तीन महिन्यांनी म्हणजेच १२ जुलैच्या दरम्यान शनी वक्री मार्गाने पुन्हा मकर राशीत येईल. (Shani Sade Sati 2022 in Marathi)
5 / 12
शनीच्या या वक्री मार्गामुळे पुढील सुमारे सहा महिन्यांचा काळ म्हणजेच १७ जानेवारी २०२३ पर्यंत पुन्हा एकदा धनु राशीचा साडेसातीचा काळ सुरू होईल. परंतु, १७ जानेवारी २०२३ नंतर धनु राशीची साडेसाती खऱ्या अर्थाने संपुष्टात येईल. याच सहा महिन्याच्या कालावधीत मीन राशीला साडेसातीपासून काहीसा दिलासा मिळेल. (Saturn Transit 2022)
6 / 12
शनी ग्रहाच्या १७ जानेवारी २०२३ नंतर राशीबदलानंतर मीन राशीची साडेसाती पुन्हा प्रामुख्याने सुरू होईल. धनु राशीनंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येण्यासाठी २०२५ वर्ष उजाडेल. त्यामुळे सन २०२२ मध्ये शनीच्या राशीबदलामुळे खूप मोठा प्रभाव या तीन राशींसह अन्य राशींवर पडेल, असे सांगितले जात आहे.
7 / 12
आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो. प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. साडेसाती केव्हा येते, ते पहाणे गरजेचे आहे. समजा आपली जन्म रास तूळ आहे. तर कन्या-तूळ -वृश्चिक राशीतून होणारे शनिचे भ्रमण आपणास साडेसाती आणणारे ठरणार आहे, म्हणजे राशीस बारावा-पहिला-दुसरा शनी असताना साडेसाती असते.
8 / 12
साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनिचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते व चंद्रापासून ४५ अंशापुढे शनी गेला की साडेसाती संपते.
9 / 12
सर्वसाधारण जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनिने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते. ही पहिली अडीच वर्षे असतात. चंद्रराशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरी अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनिने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू होतात. असा हा सर्व मिळून साडेसात वर्षांचा काळ म्हणून यास साडेसाती असे म्हणतात.
10 / 12
साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. तसेच शनीची उपासना, स्तोत्र पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
11 / 12
दुसरीकडे, आताच्या घडीला मिथुन आणि तूळ राशीवर ढिय्या प्रभाव सुरू आहे. २९ एप्रिल २०२२ नंतर मिथुन आणि तूळ राशीवरील ढिय्या प्रभाव संपुष्टात येईल. मात्र, शनीच्या वक्री चलनामुळे साडेसातीप्रमाणे जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत पुन्हा ढिय्या प्रभाव राहील. तो जानेवारी २०२३ नंतर पूर्णपणे संपुष्टात येईल.
12 / 12
सन २०२२ मध्ये कर्क आणि वृश्चिक राशीवर ढिय्या प्रभाव असेल. जानेवारी २०२३ मध्ये तो पूर्णपणे लागू होईल. २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य