शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shani Gochar 2023: १७ जानेवारीपासून मकर राशीसकट 'या' दोन राशींचे येणार "अच्छे दिन'; होणार शनी देवांची कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 7:00 AM

1 / 6
२०२३मध्ये १७ जानेवारीला शनि ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. या स्थित्यंतराचा शुभ परिणाम तीन राशींवर मुख्यत्वे दिसून येईल. मकर आणि कुंभ ही शनी देवांची हक्काची स्थाने आहेत. त्यामुळे ते स्वगृही असणार आहेत. त्याचे शुभ पडसाद लवकरच दिसून येतील.
2 / 6
शनी देवाचा कुंभ राशीत प्रवेश होत असल्याने त्याचा शुभ परिणाम धनु, मकर आणि कुंभ राशीवर दिसून येईल. १७ जानेवारी हा दिवस धनु राशीच्या साडेसातीच्या समाप्तीचा दिवस असेल तर मकर राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होण्याचा तो काळ असेल.
3 / 6
साडेसातीचा काळ हा खडतर असला तरी हा काळ परीक्षा बघणारा असतो. या काळात कोणाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर कोणासाठी तो उत्कर्षाचा काळ ठरतो. या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो तर शनिदेव साडेसातीच्या शेवटच्या काळात भरपूर लाभ देतात. म्हणून मकर राशीच्या दृष्टीने हे स्थित्यंतर महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच धनु आणि कुंभ राशीच्या वाट्याला काय येणार तेही जाणून घेऊ.
4 / 6
धनु : १७ जानेवारी नंतरचा काळ धनु राशीसाठी पूर्णपणे अनुकूल असेल. साडेसातीच्या काळात आलेल्या अनुभवावरून ते भावी आयुष्यात यशस्वी वाटचाल करतील. यासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नांना उपासनेची जोड द्यावी. विशेषतः शिव शंकराची उपासना त्यांना फलदायी ठरू शकेल.
5 / 6
मकर : १७ जानेवारी रोजी मकर राशीचा अंतिम टप्पा सुरू होणार आहे. मकर राशीच्या वाट्याला खडतर प्रवास ठरलेला असतो. मात्र १७ जानेवारी नंतर त्यांच्या वाट्याला अच्छे दिन येणार आहेत. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक अडचणी दूर होतील. जानेवारीमध्ये माघी गणेशोत्सवदेखील आहे. त्या पार्श्वभूमीवर मकर राशीच्या लोकांनी गणेश उपासना सुरू करावी. विघ्नहर्ता बाप्पा त्यांना आगामी काळ सुखाचा बनवण्यास नक्कीच आशीर्वाद देईल.
6 / 6
कुंभ : शनीच्या स्थित्यंतराचा शुभ परिणाम कुंभ राशीच्या वाट्यालाही येणार आहे. वास्तविक त्यांची साडेसाती सुरू असून त्यांच्यासाठी हा परीक्षेचा काळ आहे. परंतु वर म्हटल्याप्रमाणे कुंभ ही देखील शनी देवाची प्रिय रास असल्याने शनी देव स्वगृही गेल्याचा लाभ या राशीलाही दिसून येईल. साडेसातीचा प्रभाव कमी होईल. अडचणी येतील पण मार्गही सापडेल. कष्ट घ्यावे लागतील पण यश मिळेल. त्यामुळे साडेसाती असूनही नसल्यागत त्यांना अनेक प्रकारचे शारीरिक, आर्थिक, मानसिक लाभ होतील. त्यांनी आपल्या प्रयत्नांना मारुती उपासना, शंकर उपासना तसेच शनी उपासनेची जोड द्यावी.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष