शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२४ ला शनीचे गोचर कसे? ६ राशींवर असेल कृपा, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 3:08 PM

1 / 9
काही दिवसांनी विद्यमान २०२३ या इंग्रजी वर्षाची सांगता होईल. त्यानंतर २०२४ हे नवे इंग्रजी वर्ष सुरू होईल. आतापासून नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचे प्लानही पूर्णत्वास जात आहेत. नवीन वर्षी कोणते संकल्प करावे, याविषयी विचार केले जात आहेत. मात्र, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास सन २०२४ हे वर्ष विशेष ठरणार आहे.
2 / 9
नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह २०२४ मध्ये कुंभ राशीतच असणार आहे. यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती २०२४ लाही कायम राहणार आहे. ज्योतिषशास्त्रीय नियमांनुसार, जेव्हा शनी एखाद्या राशीत गोचर करतो, तेव्हा त्यावेळी चंद्र कोणत्या राशीत आहे, त्यावरून शनीची पाया काय असेल, हे काढले जाते.
3 / 9
शनी लोह, ताम्र, रजत किंवा सोन पावलांनी गोचर करणार आहे का, हे पाहिले जाते. या नियमानुसार सन २०२४ मध्ये शनीचा पाया कसा असेल, २०२४ मध्ये मेष ते मीन राशीपर्यंत शनी पावलाचा प्रभाव कसा असेल, याविषयी सांगितले गेले आहे. तसेच काही उपाय सुचवले गेले आहेत. जाणून घेऊया...
4 / 9
सन २०२४ मध्ये मेष, सिंह आणि धनु या राशींवर शनी लोह पाया प्रभाव राहील. या राशीच्या व्यक्तीना लोकांना आर्थिक, घरगुती आणि व्यावसायिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात नफा कमी आणि खर्च जास्त असू शकतो. २०२४ मध्ये आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शक्य असेल तर दर शनिवारी शनि यंत्राचे पूजन करावे.
5 / 9
सन २०२४ मध्ये वृषभ, कन्या आणि कुंभ या राशींवर शनी ताम्र पाया प्रभाव राहील. या तीन राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ खूप शुभ ठरू शकेल. करिअर आणि बिझनेसमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतील. उच्च प्रतिष्ठित लोकांशी संपर्क आणि पदोन्नतीसाठी अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. सुखसोयींमध्ये वाढ झालेली दिसेल. देश-विदेशात फिरण्याची संधीही मिळू शकते. शक्य असेल तर, मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींची पूजा करावी.
6 / 9
सन २०२४ मध्ये मिथुन, वृश्चिक आणि मकर राशींवर शनीच्या सोनपावलांचा प्रभाव राहील. शनीच्या सुवर्ण पायामुळे या राशीच्या व्यक्तींना २०२४ हे वर्ष थोडे संघर्षाचे असणार आहे. अनेक विरोधाभासी परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक समस्यांनाही सामोरे जावे लागेल. उत्पन्नाच्या बाबतीतही चिंतेत असाल. शत्रूच्या भीतीने आणि शारीरिक वेदनांनी त्रस्त होऊ शकता. खर्चही जास्त होणार आहे. मानसिक तणाव असेल. भावंडांशीही काही मुद्द्यावरून मतभेद होतील. शनीकृपेसाठी प्रत्येक शनिवारी शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
7 / 9
सन २०२४ मध्ये कर्क, तूळ आणि मीन राशींवर शनी रजत पायाचा प्रभाव राहील. या तीन राशीच्या व्यक्तींवर शनीकृपा राहून आगामी काळ शुभ ठरू शकेल. नोकरीत बढतीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. परदेश प्रवास घडू शकतील. प्रयत्नांमध्ये यश मिळेल. अनपेक्षित चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभासोबतच तुम्हाला उच्च प्रतिष्ठा, जमीन, वाहन, सुख, संतती इ. कौटुंबिक सुख मिळेल. शक्य असेल तर, दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला दुधात पाणी मिसळून अर्पण करा.
8 / 9
एका राशीत शनी सुमारे अडीच वर्ष असतो. २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करेल. यानंतर मकर राशीची साडेसाती संपेल आणि मेष राशीची साडेसाती सुरू होईल. सन २०२४ या संपूर्ण वर्षात मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीचा दुसरा टप्पा आणि मीन राशीचा पहिला टप्पा सुरू राहील.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य