शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनीचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना प्रतिकूल, सोशल मीडियावर सावध राहा; समस्यांचा संमिश्र काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 6:41 AM

1 / 9
सन २०२३ वर्ष सुरू झाले आहेत. नव्या वर्षातही ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव बारा राशींसह देश-दुनियेवर पडताना दिसू शकेल. ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचा न्यायाधीश शनी ग्रह गोचर करणार आहे. शनीचे राशीपरिवर्तन अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. (saturn transit in aquaries 2023)
2 / 9
शनीचा कुंभ प्रवेश विशेष ठरणारा आहे. कारण नवग्रहांमध्ये शनी हा सर्वांत मंदगतीचा ग्रह आहे आणि याचा प्रभाव दीर्घकाल टिकणारा असतो, असे म्हटले जाते. त्यामुळेच शनीचे गोचर ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे मानले जाते. सुमारे ३० वर्षांनंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (shani gochar in kumbha rashi 2023)
3 / 9
१७ जानेवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत येईल. कुंभ ही शनीची मूळ त्रिकोणी रास आहे. मूलत्रिकोण राशीत आल्याने शनीचा देश आणि जगावर व्यापक प्रभाव पडेल. ज्योतिषशास्त्रात शनीला दंडदाता म्हणतात. अशा परिस्थितीत मेष, सिंह राशीसह अनेक राशींसाठी या शनीचा कुंभ प्रवेश प्रतिकूल ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. मानसिक त्रास वाढू शकतो. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उत्पन्नाच्या तुलनेत जास्त खर्च होईल. प्रगतीत अडथळे येऊ शकतात. तुमच्या वडिलांसोबतचे नाते जपा आणि कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. परंतु २२ एप्रिलपासून या राशीत गुरुचा प्रवेश झाल्यानंतर शुभवार्ता मिळू शकतील आणि सन्मान वाढेल.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. काम-व्यवसाय आणि प्रगतीमध्ये अडथळे येतील. काम आणि धावपळीमुळे आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. कोणाशीही बोलताना काळजी घ्या. विचार करूनच वडील किंवा शिक्षकांशी बोला. उत्तरार्धात काही रखडलेल्या कामांमध्ये यश मिळेल.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकतो. व्यावसायिक गुंतागुंत वाढू शकते. कामकाजात अडचणी येऊ शकतात. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. भावंडांमध्ये मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातो.
7 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. या राशीच्या व्यक्तींवर शनीच्या ढिय्या प्रभावाचा प्रतिकूल परिणाम दिसू शकेल. पैशासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. घरगुती आणि व्यवसायाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. नातेसंबंध बिघडणार नाही, याकडे लक्ष द्या.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना शनीचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणार आहेत. ज्यामुळे आर्थिक संतुलन बिघडू शकते. कामे करताना अडचणी येऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये सावधगिरी बाळगा. व्यावसायिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. सोशल मीडियावर फसवणूक करण्यापासून सावध राहा. मात्र, २२ एप्रिलनंतर गुरुने मेष राशीत प्रवेश केल्यावर लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील.
9 / 9
शनीच्या कुंभ प्रवेशाने साडेसाती चक्र बदलणार आहे. धनु राशीची साडेसाती पूर्णपणे संपुष्टात येईल. तर मीन राशीची साडेसाती सुरू होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य