शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२३ ला ‘या’ राशीची साडेसाती सुरु; शनी कृपेसाठी ५ कामे अवश्य करा, प्रतिकूल प्रभाव कमी होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 8:35 AM

1 / 9
नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी १७ जानेवारी २०२३ रोजी आपले स्वामित्व असलेल्या मकर राशीतून स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करत आहे. सुमारे अडीच वर्ष शनी याच राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. (Shani Sade Sati 2023)
2 / 9
शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशाने साडेसातीचे चक्र बदलणार आहे. धनु राशीची साडेसाती पूर्णपणे संपेल आणि मीन राशीची साडेसाती सुरू होईल. विशेष म्हणजे या दोन्ही राशींचा स्वामी गुरु आहे.
3 / 9
शनी कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा मकर, कुंभ आणि मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. याशिवाय मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढिय्या प्रभावापासून मुक्ती मिळेल. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होईल.
4 / 9
शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान झाल्यावर मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा असेल आणि मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा प्रारंभ होईल. शनी साडेसाती तीन टप्प्यांत असते. यापैकी दुसरा टप्पा हा सर्वांत त्रासाचा, कष्टकारी आणि वेदनादायक मानला जातो.
5 / 9
शनी हा क्रूर ग्रह असला तरी कर्मकारक आहे. जसे ज्याचे कर्म, तशी फळे त्या त्या व्यक्तीला मिळतात, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, शनीची दृष्टी शुभ असेल तर व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळते.
6 / 9
साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. तसेच शनीची उपासना, स्तोत्र पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
7 / 9
साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्या राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक शनिवारी ११ वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे. असे करणे फायदेशीर ठरू शकेल. तसेच शनिवारी काहीतरी दान करावे. शनी महादशा किंवा अंतर्दशेत नदान करणे चांगले मानले जाते.
8 / 9
ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे. तसेच पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
9 / 9
शनी साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्यांनी ज्येष्ठ व्यक्तींशी आदराने वागावे. नोकरीच्या ठिकाणीही सहकाऱ्यांशी चांगले वागावे. कोणाचा अनादर करत असाल तर तुम्हाला शनीच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य