शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ महिने शनीकृपा! ५ राशींना नववर्ष खास, चहुबाजूंनी यश; परदेश वारीचा योग, नक्षत्र गोचराचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:53 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह नियमित अंतराने राशीपरिवर्तन करत असतात. तसेच नवग्रह २७ नक्षत्रांमधूनही गोचर करत असतात. नवग्रहांचे राशीपरिवर्तन जितके महत्त्वाचे मानले जाते, तेवढेच नक्षत्र गोचरालाही महत्त्व असते, असे सांगितले जाते. नवग्रहांकडे राशीप्रमाणे नक्षत्रांचेही स्वामित्व असते. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह नक्षत्र गोचर करत आहे.
2 / 9
राहुचे स्वामित्व असलेल्या शततारका नक्षत्रात शनीने प्रवेश केला आहे. ०६ एप्रिल २०२४ पर्यंत शनी या शततारका नक्षत्रात विराजमान असेल. शततारका नक्षत्राचा स्वामी असलेला राहु आताच्या घडीला मीन राशीत आहे. तर, शनी आपल्या मूलत्रिकोणी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे.
3 / 9
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शुक्र ग्रह तूळ राशीत विराजमान होईल. यानंतर शनी आणि शुक्राचा नवम पंचम योग जुळून येणार आहे. शनीच्या नक्षत्र गोचराचा प्रभाव २०२३ च्या वर्षअखेरीसह नववर्ष २०२४ वरही असणार आहे. यामुळे २०२३ ची सांगता आणि नववर्ष २०२४ ची सुरुवात काही राशींसाठी उत्तम मानली जात आहे.
4 / 9
शनीच्या नक्षत्र गोचराचा ५ राशीच्या व्यक्तींना चांगला लाभ होऊ शकेल. शनी देवाची कृपा मिळू शकेल. २०२३ चे उर्वरित ३६ दिवस आणि नववर्षातील सुरुवातीचे ३ महिने ५ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आघाडी, नोकरी, करिअर, व्यवसाय, कुटुंब अशा अनेकविध क्षेत्रात यश-प्रगती साध्य करण्याच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर शुभ प्रभाव वृद्धी करणारे ठरू शकते. करिअरशी संबंधित शुभ परिणाम मिळतील. व्यवसायातील कमाई वाढेल. नफा मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बँक बॅलन्स वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शनिदेवाच्या कृपेने अध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. जीवनात सुख-समृद्धी वाढेल.
6 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर प्रगतीकारक ठरू शकेल. करिअरमध्ये यश मिळेल. करिअरमधून कमाई करता येऊ शकेल. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात नफा होईल. कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्येतून दिलासा मिळू शकेल. प्रत्येक कामात मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करणाऱ्या लोकांचे बेत यशस्वी होऊ शकतील.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर उत्तम ठरू शकेल. शनिदेवाच्या कृपेने प्रत्येक कामात यश मिळेल. कुठेतरी अडकलेला पैसा परत मिळू शकेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये अपेक्षित यश मिळू शकेल. कार्यालयातील वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर यशकारक ठरू शकेल. शनीचा शुभ नक्षत्रात प्रवेश नवीन वर्षात धनलाभकारक ठरू शकेल. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. शुभ लाभ मिळतील. पैसे वाचवू शकतील. शनिदेवाच्या कृपेने नवीन वर्षात विवाह योगाची शक्यता निर्माण होईल. शुभ परिणाम मिळतील.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकेल. प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळतील. कामाचा फायदा होईल. जीवनात सकारात्मक प्रभाव वाढेल. कुटुंबाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. समाजात सन्मान वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य