शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुखी संसाराचे रहस्य या १० मुद्द्यांमध्ये सामावले आहे, तुम्हालाही ते नक्की पटतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 4:31 PM

1 / 10
गोरगरीब लोक आपल्या पूर्व कर्मानुसार प्रारब्ध भोग भोगत असतात. त्यांच्या परिस्थितीची, त्यांची टिंगल करू नका. कारण कोणाचे प्रारब्ध कधी फिरेल हे सांगू शकत नाही.
2 / 10
कोणाच्याही परिस्थितीचा, असहायतेचा गैरफायदा घेऊन त्याचे धन, संपत्तीचा उपभोग घेऊ नका. याचे भयंकर वाईट परिणाम भोगावे लागतात. मनुष्याचे वैभव कमी होत जाऊन प्रगतीत बाधा निर्माण होऊन त्याच्या जीवनाला उतरती कळा लागते.
3 / 10
दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगणारा, त्याचप्रमाणे नोकरी करत वरकमाई करणारा, काळा बाजार करून माया जमा करणारा आणि देवकार्याच्या पैशाचे अपहरण करणारा मनुष्य कधीच सुखी होत नाही. तो रात्रंदिवस अस्वस्थ आणि चिंताग्रस्त राहून त्यला अनेक लोकांची गुलामगिरी आणि लाचारी पत्करावी लागते.
4 / 10
प्रत्येकाचा उत्कर्ष हा त्याच्या पूर्वकर्माच्या पुण्यसंचावर अवलंबून असतो. म्हणून गुणवान व्यक्तीचा द्वेष न करता त्यांच्या संगतीत राहून आपला उत्कर्ष साधावा.
5 / 10
असे लोक आपल्याच नातेवाईकांविषयी संशयाचे भूत आपल्या मनात निर्माण करून आपल्या नातेसंबंधात दुरावा निर्माण करतात.
6 / 10
धर्म जोपासणे म्हणजे ईश्वरी सेवा करणे. ईश्वर साक्षीने, ईश्वर साथीने चाललेला संसार हा चतुर्भूज विष्णूचा संसार असल्याने सुखाचा आणि शांती समाधानाचा असतो. ईश्वराचे नित्यचिंतन करून ईश्वर साक्षीने संसार करावा. या जगातील सर्व गोष्टीवर ईश्वराचा अधिकार आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ईश्वराच्या हाती आहे. ईश्वरच सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहे.
7 / 10
गृहलक्ष्मी असणारी बायको असो, नाहीतर जन्मदात्री आई, तसेच मुलगी, बहीण, आत्या, मावशी, आजी, काकू अशी स्त्रिरुपातील सर्व शक्ती सदैव आपल्याला आधार देत असते. तिचा मान ठेवा. तसेच परस्त्रीचा मोह टाळा. तसे केल्याने एकाच वेळी अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते.
8 / 10
यालाच `ऋण काढून सण साजरे करणे' अशी म्हण आहे. ती बाब टाळली पाहिजे. प्रत्येकाला आपल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक क्षमतेचा अंदाज असतो. ते पाहता `अंथरुण पाहून पाय पसरणे' इष्ट ठरते अन्यथा कर्जाची टांगती तलवार सुखाने जगू देत नाही.
9 / 10
असे लोक विशिष्ट अहंकारात वावरत असतात. ते इतरांना कमी लेखतात व स्वत:चा बढेजाव करतात. अशा लोकांपासून चार हात दूर राहावे. आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करावा, सुखाचे आयुष्य जगावे.
10 / 10
सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे जिने आपल्याला जन्म दिला ती आई आणि जिने आपले पालन पोषण केले ती आपली मातृभूमी यांचे ऋण कधीच विसरू नका. माता-पिता, गुरुजन, मित्रपरिवार, नातलग यांच्याशी संबंध कधीच दुरावू देऊ नका.